# sad news (news sources) — RSS Amplifier

Recent posts from the 1 feeds in the RSS Amplifier directory that cover sad news.

Page: <https://rssamplifier.com/topics/sad-news/news>  
Feed: <https://rssamplifier.com/topics/sad-news/news.md>

---

## [साखर उद्योगाला दिलासा : कच्च्या साखरेच्या आयात नियमात बदल](https://sugartoday.in/relief-for-the-sugar-industry-changes-in-raw-sugar-import-rules/)

_2026-08-26 · Author 1 · sugartoday_

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुल्कमुक्त कच्च्या साखरेच्या आयात आणि विक्रीसाठीच्या अटींमध्ये महत्त्वाची सुधारणा केली आहे. नव्या नियमानुसार आता आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती देशांतर्गत बाजारात विकण्यासाठी दोन महिन्यांची मुदत मिळणार आहे.यापूर्वी टॅरिफ रेट कोटा (TRQ) अंतर्गत आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकणे बंधनकारक होते. मात्र,…

## [मागणीअभावी साखर गडगडली ; क्विंटलमागे 500 रुपयांची घसरण](https://sugartoday.in/due-to-low-demand-sugar-prices-tumbled-a-drop-of-500-rupees-per-quintal/)

_2026-08-26 · Author 1 · sugartoday_

पुणे : केंद्र सरकारच्या विविध उपाययोजना आणि साखर साठ्याची माहिती संकलनाच्या हालचालींमुळे साखर बाजारावर दबाव वाढला आहे. याचा थेट परिणाम साखरेच्या निविदा दरावर झाला असून, मागणीअभावी दर क्विंटलमागे तब्बल 500 रुपयांनी गडगडले आहेत. ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने 22.50 लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. कोट्याची विक्री करण्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक असताना ग्राहकांकडून \[…\]

## [गुळ पावडर उद्योगांना दिलासा; मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक](https://sugartoday.in/relief-for-jaggery-powder-industries-chief-minister-fadnavis-is-positive/)

_2026-08-26 · Author 1 · sugartoday_

लातूर : गुळ पावडर उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखालील उद्योग प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीत उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली. यामध्ये उत्पादन खर्च, बाजारपेठेतील स्पर्धा, तसेच नियामक अडचणींचा उल्लेख करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस…

## [साखर दरातील तेजीचा शेतकऱ्यांना लाभ द्या](https://sugartoday.in/give-farmers-the-benefit-of-the-rising-sugar-prices/)

_2026-08-26 · Author 1 · sugartoday_

जयसिंगपूर : गत गळीत हंगामात तुटलेल्या उसापासून तयार झालेल्या साखरेसह विविध उपपदार्थांना वर्षभर चांगले दर मिळाले आहेत. साखरेच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने शिरोळ तालुक्यातील दत्त, जवाहर, गुरुदत्त आणि पंचगंगा या \[…\]

## [गंगामाऊली शुगरकडून विविध कामांसाठी निविदा जाहीर](https://sugartoday.in/gangamauli-sugar-announces-tenders-for-various-works/)

_2026-08-26 · Author 1 · sugartoday_

अमळनेर : गंगामाऊली शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि., आसोडा नगर, उमरेड, जि. जळगाव येथील कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी विविध कामे करण्यासाठी अनुभवी कंत्राटदारांकडून निविदा मागविल्या आहेत. या निविदांमध्ये बॉयलरमधील बगॅस काढण्याचे काम, मिल गाळे मारण्याचे काम, बॉयलर राख हाताळणी व विक्री, शुगर हाऊसमध्ये गोणीत हमाली, चुना गंधक हाताळणी, प्रेसमड हाताळणी व वाहतूक, \[…\]

## [देसाई कारखान्यात ‘कार्यकारी संचालक’ पदासाठी भरती](https://sugartoday.in/recruitment-for-the-position-of-executive-director-at-desai-factory/)

_2026-08-26 · Author 1 · sugartoday_

सातारा : दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. येथे आमचे प्रतिदिन २५०० मे. टन गाळप क्षमतेच्या कारखान्यासाठी ‘कार्यकारी संचालक’ या पदासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी साखर कारखान्यात सदर पदाचा किमान पाच ते दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच इंजिनिअरिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग विभागातील संबंधित \[…\]

## [ओंकार साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई](https://sugartoday.in/attachment-action-taken-against-omkar-sugar-factory/)

_2026-08-25 · Author 1 · sugartoday_

धाराशिव – परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार साखर कारखान्याने २०२५-२६ गाळप हंगामातील एफआरपी (Fair and Remunerative Price) शेतकऱ्यांना पूर्णपणे न दिल्याने कारवाईचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पुणे येथील साखर आयुक्तांनी या थकबाकीबाबत कठोर भूमिका घेतली असून, कारखान्याची चल-अचल मालमत्ता जप्त करून विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. यात साखर, गूळ, मळी व बगॅस यांचा समावेश \[…\]

## [शिवगिरी अॅग्रो शुगर वर्क्स प्रा. लि. मध्ये भरती](https://sugartoday.in/recruitment-at-shivgiri-agro-sugar-works-pvt-ltd/)

_2026-08-25 · Author 1 · sugartoday_

सोलापूर : शिवगिरी अॅग्रो शुगर वर्क्स प्रा. लि., भैरवनाथ शुगर वर्क्स लि. विहाल यांच्या भाडेतत्त्वावर चालणाऱ्या कारखान्यात 2500 मेट्रिक टन क्षमतेच्या साखर कारखान्यासाठी विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज व बायोडेटा सदरील पदावर प्रत्यक्ष काम केल्याचा पाच ते सात वर्षाचा अनुभव असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज \[…\]

## [✍️ संपादकीय विश्लेषण : साखर उद्योग तपासणी](https://sugartoday.in/editorial-analysis-sugar-industry-audit/)

_2026-08-25 · Author 1 · sugartoday_

सध्या राज्यभरात सुरू झालेली साखर उद्योग व व्यापाऱ्यांची तपासणी ही केवळ प्रशासनिक कारवाई नसून, ती बाजारव्यवस्थेतील पारदर्शकता आणि ग्राहकहिताचे संरक्षण यासाठी महत्त्वाची पायरी आहे. साखरेच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर सरकारने साखर कारखाने, व्यापारी आणि मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या साठ्याची तपासणी तीव्र केली आहे. ही कारवाई केवळ साठेबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी नसून, साखरेच्या…

## [साखरेच्या साठ्याचा हिशेब जाहीर करा, अन्यथा आंदोलन](https://sugartoday.in/disclose-sugar-stock-figures-or-face-agitation/)

_2026-08-24 · Author 1 · sugartoday_

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी सातत्याने अडचणीत येत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. साखरेच्या उपलब्ध साठ्याबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी आणि तब्बल ४८ लाख टन साखरेचा हिशेब द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. देशातील साखर उत्पादन, उपलब्ध साठा आणि बाजारातील दरवाढ याबाबत \[…\]

## [Know before it drops (Sponsored)](https://crawlproof.com/a/QTzFbJ7WIgHq)

_2026-08-24 · **Sponsored**_

Follow a show, artist, genre or rocket and get notified before release

## [साखर दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांच्या अपेक्षा पल्लवित](https://sugartoday.in/sugarcane-growers-expectations-are-rising-in-the-wake-of-sugar-price-hike/)

_2026-08-22 · Author 1 · sugartoday_

पुणे : साखरेच्या बाजारभावात अचानक मोठी वाढ झाल्याने साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. गुरुवारी साखरेच्या दराने विक्रमी पातळी गाठत प्रतिक्विंटल सुमारे ६५०० ते ७२०० रुपयांपर्यंत मजल मारल्याची माहिती बाजारातील सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांत झालेल्या या अनपेक्षित दरवाढीमुळे साखर बाजारात विविध चर्चांना उधाण आले आहे. गेल्या पंधरवड्यात साखरेच्या दरात प्रतिक्विंटल…

## [साखरेच्या दरातील तेजीला केंद्राकडून लगाम?](https://sugartoday.in/will-the-centre-rein-in-the-surge-in-sugar-prices/)

_2026-08-22 · Author 1 · sugartoday_

नवी दिल्ली : साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ बसत असताना केंद्र सरकारने दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून बाजारात दरवाढ करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी साठेबाजीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, साखर साठवणुकीसंदर्भात कडक…

## [&#8216;ओंकार&#8217;च्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन रविवारी होणार](https://sugartoday.in/the-inauguration-of-omkars-new-head-office-will-take-place-on-sunday/)

_2026-08-22 · Author 1 · sugartoday_

पुणे : ओंकार शुगर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन रविवार, २३ ऑगस्ट रोजी औंध, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली आहे. नवीन कार्यालयामुळे कारखान्याच्या प्रशासनिक व व्यावसायिक कामकाजाला गती मिळणार असून शेतकरी व उद्योग क्षेत्रातील समन्वय अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे \[…\]

## [कोळशापासून गॅस निर्मितीचा मेगा प्रकल्प](https://sugartoday.in/mega-project-for-gas-production-from-coal/)

_2026-08-21 · Author 1 · sugartoday_

रिलायन्सची ३० वर्षांची मोठी योजना नवी दिल्ली : देशातील ऊर्जा क्षेत्रात मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून, रिलायन्स इंडस्ट्रीजने आंध्र प्रदेशात भूमिगत कोळसा वायूकरणाचा (UCG) प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुढील ३० वर्षांत सुमारे २.७३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. रिलायन्सच्या या प्रकल्पात जमिनीखालील कोळशाचे रूपांतर…

## [साखरेचे दर सात हजारांच्या विक्रमी पातळीवर!](https://sugartoday.in/sugar-prices-at-a-record-high-of-7000/)

_2026-08-21 · Author 1 · sugartoday_

ग्राहकांना बसतेय दरवाढीची झळ पुणे : देशपातळीवरील साखर व्यापारात मोठी तेजी निर्माण झाली असून, सट्टेबाजांनी बाजारात सक्रिय सहभाग घेतल्याने साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत एस-३० ग्रेड साखरेचे दर प्रतिक्विंटल सुमारे १३० रुपयांनी वाढले असून, गुरुवारी सायंकाळी ते ६ हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचले. शुक्रवारीही बाजारात तेजी शुक्रवारी बाजारातही तेजी कायम राहिली. प्रतिक्विंटल \[…\]

## [इथेनॉल निर्मितीत सातारा आघाडीवर!](https://sugartoday.in/satara-at-the-forefront-of-ethanol-production/)

_2026-08-21 · Author 1 · sugartoday_

कारखान्यांना मिळतेय नवी आर्थिक ताकद सातारा : केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला मिळालेल्या गतीमुळे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा वळविला आहे. गत हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तब्बल २० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले असून, अनेक कारखान्यांनी डिस्टिलरी प्रकल्पांची क्षमता वाढविण्याचे नियोजन सुरू केले आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला…

## [भारती शुगर्स अँड एनर्जीमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखती](https://sugartoday.in/walk-in-interviews-for-various-positions-at-bharati-sugars-energy/)

_2026-08-21 · Author 1 · sugartoday_

सांगली : भारती शुगर्स अँड एनर्जी प्रा. लि., नागवाडी येथे विविध विभागांतील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, भरतीसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. कारखान्याची प्रतिदिन सुमारे ४,००० मे. टन ऊस गाळप क्षमता असून, को-जनरेशन आणि इथेनॉल प्रकल्पाचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यातील इंजिनिअरिंग, उत्पादन, शेती तसेच इतर विभागांतील विविध पदांसाठी अनुभवी \[…\]

## [साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारची कडक पावले](https://sugartoday.in/central-government-takes-strict-measures-to-curb-sugar-hoarding/)

_2026-08-21 · Author 1 · sugartoday_

नवी दिल्ली : साखरेच्या वाढत्या वापरावर आणि बाजारातील दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणाऱ्या घाऊक ग्राहकांसाठी साठा मर्यादा निश्चित केली आहे. या निर्णयानुसार महिन्याला १० मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेची खरेदी करणाऱ्या उद्योग व व्यावसायिक ग्राहकांना १५ दिवसांच्या गरजेपेक्षा जास्त साखर साठवून ठेवता येणार नाही. सरकारने साखर बाजारावर देखरेख वाढविली असून,…

## [राजारामबापू कारखान्याच्या प्रगतीत नव्या पाऊलाची भर : आ. जयंत पाटील](https://sugartoday.in/a-new-step-forward-in-the-progress-of-rajarambapu-sugar-factory-mla-jayant-patil/)

_2026-08-21 · Author 1 · sugartoday_

सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या योगदानातून सातत्याने प्रगती साधली आहे. भविष्यातही कारखान्याने बदलत्या काळानुसार नवे प्रकल्प हाती घेत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, अशी अपेक्षा आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. साखर उद्योगातील बदलते तंत्रज्ञान आणि वाढती स्पर्धा लक्षात घेता कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता विविध पूरक उद्योगांकडे वळणे…

## [पंजाबमध्ये साखर कारखाने उभारण्याचा अनुभव अविस्मरणीय](https://sugartoday.in/panjab-experience-is-memorabe-s-b-bhads-special-interview/)

_2026-08-21 · SugarToday · sugartoday_

एस. बी. भड (चेअरमन, एस एस इंजिनिअर्स) यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध उद्योजक श्री. शहाजीराव भड (एस. बी. भड) हे भारताच्या साखर उद्योग क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. ते साखर उद्योग क्षेत्रात १९७२ पासून कार्यरत आहेत, तब्बल ५३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले ते डिझाईन इंजिनिअर आहेत. सुमारे साडेचार दशकांपूर्वी त्यांनी ‘एस. एस. इंजिनिअर्स’ ही कंपनी दहा वर्षे \[…\]

## [Realtime AI Arbitrage Terminal (Sponsored)](https://crawlproof.com/a/6p8Ba1B7sE08)

_2026-08-21 · **Sponsored**_

Realtime auto-trading across exchanges with scored setups, backtesting, and risk controls.

## [शेतकऱ्यांची जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी द्यावा : चेअरमन सत्यशील शेरकर](https://sugartoday.in/shri-vighnahar-sugar-44th-general-body-meeting/)

_2026-08-20 · SugarToday · sugartoday_

श्री विघ्नहर कारखान्याची सभा उत्साहात; ‘स्वतंत्र ऊस विकास विभागा’ची स्थापना पुणे:जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा १९ ऑगस्ट रोजी कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडली. कारखान्याच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणानंतर आता आगामी गाळप हंगामात तब्बल १२ ते १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप \[…\]

## [यशोदा कदम उर्फ अक्का यांचे निधन](https://sugartoday.in/yashoda-mohanrao-kadam-alias-akka-is-no-more/)

_2026-08-20 · SugarToday · sugartoday_

सोनहिराचे चेअरमन मोहनराव कदम यांना पत्नीशोक सांगली: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाचे माजी आमदार आणि सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांच्या पत्नी यशोदा कदम (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ‘अक्का’ या नावाने अत्यंत सुपरिचित असलेल्या यशोदा कदम यांच्या निधनामुळे सोनसळ आणि चिंचणीसह संपूर्ण पलूस-कडेगाव मतदारसंघावर शोककळा पसरली आहे. यशोदा \[…\]

## [साखर उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञान स्वीकारणे काळाची गरज](https://sugartoday.in/adopting-technology-is-the-need-of-the-hour-for-the-holistic-development-of-the-sugar-industry/)

_2026-08-20 · Author 1 · sugartoday_

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे मत पणजी : साखर उद्योगाने केवळ साखर उत्पादनापुरते मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून बहुआयामी विकासाचा मार्ग स्वीकारण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. साखर उद्योगाशी संबंधित तंत्रज्ञ, संशोधक आणि उद्योग प्रतिनिधींना एकत्र आणणाऱ्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.…

## [उंच उसात फवारणीचे आव्हान; ड्रोन तंत्रज्ञानाचा पर्याय](https://sugartoday.in/the-challenge-of-spraying-tall-sugarcane-crops-the-option-of-drone-technology/)

_2026-08-20 · Author 1 · sugartoday_

महाकाळ (ता. जालना) : अंबड तालुक्यातील महाकाळ, सुपुरी आणि परिसरातील उसाच्या पिकांवर रोग-किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मावा, तुडतुडे यांसारख्या किडींचा वाढता प्रादुर्भाव आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे उसाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला असून खत, औषधे, मशागत, पाणी आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे उत्पादन खर्चात भर पडली \[…\]

## [साखरेच्या दरात पुन्हा मोठी उसळी!](https://sugartoday.in/another-sharp-surge-in-sugar-prices/)

_2026-08-19 · Author 1 · sugartoday_

गेल्या तीन दिवसांत साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांची वाढ पुणे : साखरेचा पुरवठा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्याने बाजारातील दरवाढ कायम आहे. गेल्या तीन दिवसांत साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली असून, घाऊक बाजारात एस-३० ग्रेड साखरेचा दर मंगळवारी क्विंटलमागे ५७०० रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारातही साखरेचा दर प्रतिकिलो ५९ \[…\]

## [स्वामी समर्थ शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती](https://sugartoday.in/recruitment-for-various-positions-at-swami-samarth-sugar/)

_2026-08-19 · Author 1 · sugartoday_

अहमदनगर : स्वामी समर्थ शुगर अँड अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड, माळेवाडी-रामडोह, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे विविध विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांना पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी विभागात बॉयलर हाऊस फिटर ग्रेड, सेंट्रिफ्यूगल फिटर ग्रेड, इलेक्ट्रिशियन, वायरमन ग्रेड, स्विच बोर्ड ऑपरेटर आणि वेल्डर ग्रेड या पदांसाठी \[…\]

## [उसबिलांसाठी शेतकरी आक्रमक; सिद्धेश्वर कारखान्यात आंदोलन](https://sugartoday.in/farmers-aggressive-over-sugarcane-payments-protest-at-siddheshwar-sugar-factory/)

_2026-08-19 · Author 1 · sugartoday_

सोलापूर : गेल्या आठ महिन्यांपासून थकीत असलेल्या उसबिलांची रक्कम मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मुख्यालयात आंदोलन केले. थकीत उसबिलांबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोलापूर तालुक्यातील मंगळवेढा परिसरातील शेतकऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्याप थकीत रक्कम मिळालेली…

## [ई-२०चा तिढा कायम; जुन्या वाहनांसाठी वेगळ्या पेट्रोलचा पर्याय?](https://sugartoday.in/e-20-conundrum-persists-option-of-separate-petrol-for-older-vehicles/)

_2026-08-18 · Author 1 · sugartoday_

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण असलेल्या ई-२० इंधनाचा देशभरातील वापर वाढत असताना जुन्या वाहनांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी जुन्या वाहनांसाठी कमी इथेनॉल मिश्रणाचे ई-२० पर्यायी पेट्रोल उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. देशातील मोठ्या वाहन कंपन्यांनी तयार केलेली नवीन वाहने ई-२० इंधनासाठी अनुकूल आहेत. \[…\]

## [योगेश्वरी शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती; ३३ जागांसाठी अर्ज मागविले](https://sugartoday.in/recruitment-for-various-positions-at-yogeshwari-sugar-applications-invited-for-33-posts/)

_2026-08-18 · Author 1 · sugartoday_

परभणी : योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि., लक्ष्मीनगर, लिंबा, ता. पाथरी, जि. परभणी या साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ४५०० मे. टन असून, अभियांत्रिकी व उत्पादन विभागातील एकूण ३३ पदे भरण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी विभागात मिल फिट्टर ए ग्रेड, बॉयलर अटेंडंट, बॉयलर फायरमन, बॉयलिंग हाऊस फिट्टर \[…\]

## [Transcript-Driven Stock Discovery (Sponsored)](https://crawlproof.com/a/h2H0LG2SJwPz)

_2026-08-18 · **Sponsored**_

Ranked, evidence-backed watchlists from indexed executive transcripts for 1–2 quarter horizons

## [बारामती ॲग्रोमध्ये विविध पदांसाठी भरती](https://sugartoday.in/recruitment-for-various-positions-at-baramati-agro/)

_2026-08-18 · Author 1 · sugartoday_

पुणे : बारामती ॲग्रो लि.च्या शुगर डिव्हिजन युनिट क्रमांक १, शेटफळगढे, ता. इंदापूर, जि. पुणे येथे विविध विभागांमध्ये हंगामी तसेच कायमस्वरूपी पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. साखर उद्योगातील अनुभवी तसेच पात्र उमेदवारांना या भरतीत संधी मिळणार आहे. इंजिनिअरिंग विभागातील पदे :शिफ्ट इंजिनिअर – इन्सिनरेशन बॉयलर, ज्युनिअर इंजिनिअर – इन्स्ट्रुमेंट, DCS ऑपरेटर – इन्सिनरेशन \[…\]

