# marathi news (news sources) — RSS Amplifier

Recent posts from the 1 feeds in the RSS Amplifier directory that cover marathi news.

Page: <https://rssamplifier.com/topics/marathi-news/news>  
Feed: <https://rssamplifier.com/topics/marathi-news/news.md>

---

## [Vaibhav Sooryavanshi Bowling: फलंदाजीत अपयश येताच गोलंदाजीत कहर! 15 वर्षांच्या वैभवने 4 चेंडूंत टिपले 2 बळी; पाहा व्हिडिओ](https://www.navakal.in/krida/15-year-old-vaibhav-sooryavanshi-shines-with-ball-takes-two-wickets-in-four-balls-duleep-trophy-marathi-news/)

_2026-08-25 · Team Navakal · Navakal_

Vaibhav Sooryavanshi Bowling: भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा मानला जाणाऱ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली आहे. दुलिप ट्रॉफी स्पर्धेत पूर्व विभागाचे उपकर्णधारपद सांभाळताना पहिल्या डावात त्याला फलंदाजीत मोठी चमक दाखवता आली नाही. केवळ 6 चेंडूंचा सामना करत 8 धावांवर तो बाद झाला. मात्र, बॅटने आलेल्या अपयशाने खचून न जाता \[…\] The post Vaibhav…

## [Yash Movie Toxic Release: शुक्रवारऐवजी बुधवारीच का रिलीज होतोय यशचा &#8216;टॉक्सिक&#8217;? जाणून घ्या नवा प्लॅन](https://www.navakal.in/manoranjan/why-rocking-star-yash-toxic-movie-releasing-on-wednesday-instead-of-friday-box-office-strategy-marathi-news/)

_2026-08-25 · Team Navakal · Navakal_

Yash Movie Toxic Release: कन्नड सुपरस्टार रॉकिंग स्टार यश याचा आगामी बिगबजेट चित्रपट ‘टॉक्सिक’ तब्बल 12000 हून अधिक स्क्रीन्सवर जगभरात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटसृष्टीत नवीन चित्रपट नेहमी शुक्रवारी प्रदर्शित होण्याची जुनी परंपरा असताना, निर्मात्यांनी हा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी थेट बुधवारीच रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या या अनोख्या प्रदर्शनाच्या तारखेमुळे प्रेक्षक आणि…

## [US Military Plane Moscow Landing: तणावाच्या काळात अमेरिकेचे लष्करी विमान थेट मॉस्कोमध्ये उतरले! रशियाच्या विमानतळावर गूढ लँडिंगने जगभरात खळबळ](https://www.navakal.in/desh-videsh/us-military-aircraft-boeing-c17-globemaster-lands-in-moscow-russia-amid-ukraine-tensions-marathi-news/)

_2026-08-25 · Team Navakal · Navakal_

US Military Plane Moscow Landing: युक्रेन युद्धावरून अमेरिका आणि रशिया यांच्यात प्रचंड तणाव सुरू असतानाच एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाचे महाकाय बोईंग सी-17 ग्लोबमास्टर हे लष्करी वाहतूक विमान मंगळवारी थेट रशियाच्या राजधानीतील वनुकोव्हो विमानतळावर उतरले. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध कमालीचे ताणलेले असताना या विमानाने मॉस्कोमध्ये अचानक लँडिंग केल्याने \[…\] The…

## [Indian Teen Defeats Magnus Carlsen: 15 वर्षांच्या भारतीय मुलाचा बुद्धिबळात मोठा पराक्रम! जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनचा 50 चालींमध्ये केला पराभव](https://www.navakal.in/krida/15-year-old-indian-vandan-sawai-defeats-world-no-1-magnus-carlsen-in-titled-tuesday-chess-marathi-news/)

_2026-08-25 · Team Navakal · Navakal_

Indian Teen Defeats Magnus Carlsen: जागतिक बुद्धिबळ विश्वात अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनला हरवणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मात्र, भारताच्या अवघ्या 15 वर्षांच्या वंदन अलंकार सावंत याने ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनला अवघ्या 50 चालींमध्ये नमवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे इतका मोठा विजय मिळवूनही शांत आणि लाजाळू स्वभावाच्या वंदनने स्वतःहून घरात \[…\] The…

## [PM Modi : सुरतमधील नवनिर्मित मासे बाजाराच्या नामकरणावरून वाद: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यावर व्यापाऱ्यांचा आक्षेप..](https://www.navakal.in/desh-videsh/controversy-over-naming-of-newly-built-fish-market-in-surat-traders-object-to-using-pm-narendra-modis-name/)

_2026-08-25 · Team Navakal · Navakal_

​PM Modi : गुजरात राज्यातील सुरत येथील नानपुरा-लक्कडकोट परिसरात ३ कोटी ९० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अत्यंत आधुनिक मासे बाजाराचे नाव एका मोठ्या राजकीय व सामाजिक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या नव्याने बांधण्यात आलेल्या बाजाराला ‘श्री नरेंद्र मोदी घाऊक मासे बाजार’ असे नाव देण्यात आले असून, त्यासंबंधीचा एक मोठा फलकही (बोर्ड) बाजार परिसरात \[…\] The post PM Modi : सुरतमधील नवनिर्मित मासे…

## [Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरण: तपास सुरुवातीलाच भरकटवल्याचा वडिलांचा उच्च न्यायालयात गंभीर आरोप; सचिन वाझेंनी शवविच्छेदन अहवालात फेरफार केला!](https://www.navakal.in/maharashtra/disha-salian-case-disha-salian-death-case-father-makes-serious-allegations-in-high-court-of-early-investigation-derailment/)

_2026-08-25 · Team Navakal · Navakal_

Disha Salian Case :​ दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूचा तपास सुरुवातीच्या टप्प्यातच चुकीच्या दिशेने नेण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या संपूर्ण तपासादरम्यान निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मुख्य भूमिका वधवत हे प्रकरण जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने \[…\] The…

## [High Court On Hijab : ‘हिजाब न घातल्याने धर्म धोक्यात येत नाही!’; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, शालेय गणवेशात हिजाबला परवानगी देण्याची याचिका फेटाळली](https://www.navakal.in/desh-videsh/high-court-on-hijab-religion-is-not-endangered-by-not-wearing-a-hijab-allahabad-high-courts-major-ruling-plea-seeking-permission-to-wear-hijab-with-school-uniform/)

_2026-08-25 · Team Navakal · Navakal_

High Court On Hijab : शालेय गणवेशात हिजाब किंवा स्कार्फ परिधान करण्यास परवानगी देण्याचे निर्देश शाळा प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. प्रयागराज येथील अतरसुइया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘एका पब्लिक स्कूल’च्या विद्यार्थिनीने आपल्या आईच्या माध्यमातून ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या विद्यार्थिनीने याच शाळेतून इयत्ता १० \[…\] The…

## [Nitin Gadkari Statement: नितीन गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार? नागपूरमधून केले मोठे विधान](https://www.navakal.in/desh-videsh/nitin-gadkari-says-time-to-give-chance-to-new-generation-cabinet-reshuffle-buzz-nagpur-speech-marathi-news/)

_2026-08-25 · Team Navakal · Navakal_

Nitin Gadkari Statement: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सार्वजनिक जीवनातील आपल्या सहभागाबाबत आणि वाढत्या वयाबाबत अत्यंत मोकळेपणाने भाष्य केले आहे. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आता आपल्याकडून पूर्वीसारखे जास्त काम होत नसून, जबाबदाऱ्यांची धुरा नव्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या आणि…

## [Aadesh Bandekar : &#8216;होम मिनिस्टर&#8217;च्या नव्या पर्वाचा प्रारंभ: कोल्हापुरात २५०० हून अधिक महिलांनी केले आदेश बांदेकर यांचे औक्षण, &#8216;वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया&#8217;मध्ये नोंद](https://www.navakal.in/maharashtra/aadesh-bandekar-launch-of-the-new-season-of-home-minister-over-2500-women-in-kolhapur-performed-the-aukshan-ritual-welcome-for-aadesh-bandekar-setting-a-record-in-the-world-records-b/)

_2026-08-25 · Team Navakal · Navakal_

Aadesh Bandekar : गेली दोन दशके महाराष्ट्रातील घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा 'होम मिनिस्टर' हा अत्यंत लोकप्रिय मालिका-कार्यक्रम एका नव्या आणि ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात प्रवास करत लाखो वहिनींशी आपुलकीचे व कौटुंबिक नाते निर्माण करणाऱ्या या कार्यक्रमाने आपल्या नव्या पर्वाचा शुभारंभ एका भव्य आणि अभूतपूर्व विश्वविक्रमाने केला आहे. २,५०० हून अधिक…

## [Delhi Protests: राजधानी दिल्लीत मोठ्या आंदोलनांना रोखण्यासाठी गुप्तचर यंत्रणेत मोठे बदल! 10 महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहणार पोलिसांची करडी नजर](https://www.navakal.in/desh-videsh/delhi-police-overhauls-intelligence-system-special-branch-to-track-10-points-before-protests-marathi-news/)

_2026-08-25 · Team Navakal · Navakal_

Delhi Protests: राजधानी दिल्लीत 20 जुलै रोजी झालेल्या मोठ्या आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसेनंतर दिल्ली पोलीस प्रशासनाने आपल्या गुप्तवार्ता यंत्रणेचे संपूर्ण पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी गुप्तचर विभागाला (स्पेशल ब्रांच) शहरात होणाऱ्या कोणत्याही मोठ्या आंदोलनापूर्वी किमान 10 महत्त्वाच्या मुद्द्यांवर अचूक आणि सखोल माहिती गोळा करण्याचे स्पष्ट आदेश दिले…

## [Home Internet From Space (Sponsored)](https://crawlproof.com/a/otMNpGuGPggR)

_2026-08-25 · **Sponsored**_

Residential satellite internet that brings connectivity to homes beyond conventional networks

## [Toxic Movie Promotion Accident: &#8216;टॉक्सिक&#8217; चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मोठा गोंधळ; स्टेजवरील साऊंड बॉक्स गर्दीवर कोसळला; 2 विद्यार्थी जखमी](https://www.navakal.in/manoranjan/sound-box-collapses-at-yash-toxic-movie-promotional-event-in-hyderabad-two-students-injured-marathi-news/)

_2026-08-23 · Team Navakal · Navakal_

Toxic Movie Promotion Accident: दाक्षिणात्य सुपरस्टार यश याच्या आगामी बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाच्या प्रचार कार्यक्रमात एक अनपेक्षित दुर्घटना घडली. हैदराबाद येथील मल्ला रेड्डी युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी जमली असताना साऊंड बॉक्सचा भलामोठा सांगाडा अचानक उपस्थितांच्या अंगावर कोसळला. या अपघातात 2 विद्यार्थी…

## [नेस्ले, पेप्सिको, ॲमेझॉनसह मोठ्या ब्रँड्सवर FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर 150 हून अधिक नोटिसा जारी](https://www.navakal.in/desh-videsh/fssai-issues-over-150-notices-to-nestle-pepsico-amazon-for-misleading-ads-marathi-news/)

_2026-08-23 · Team Navakal · Navakal_

FSSAI Crackdown On Brands: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने खाद्यपदार्थ आणि पेये तयार करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. उत्पादनांचे खोटे दावे, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि पॅकेटवरील लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्राधिकरणाने गेल्या काही महिन्यांत देशभरात तब्बल 150 पेक्षा जास्त नोटिसा जारी केल्या आहेत. अन्न नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सुरू असलेल्या…

## [Baramati Crime News: बारामतीत मोठी खळबळ! आमदार रोहित पवारांच्या पीएच्या 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू; घराबाहेर आढळला मृतदेह](https://www.navakal.in/maharashtra/rohit-pawar-pa-ajit-dashavatare-minor-daughter-found-dead-in-baramati-forensic-team-investigation-news/)

_2026-08-23 · Team Navakal · Navakal_

Baramati Crime News: पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अजित दशावतारे यांच्या 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे (फॉरेन्सिक) पथक तात्काळ बारामतीतील रुई भागातील साई गणेश नगर येथे दाखल \[…\] The post Baramati…

## [Sri Sri Ravi Shankar : यमुना नदीचे नुकसान झालेच नाही ! रविशंकरना 5 कोटी रुपये परत करा](https://www.navakal.in/desh-videsh/sri-sri-ravi-shankar-%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2/)

_2026-08-23 · Team Navakal · Navakal_

Sri Sri Ravi Shankar : प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या ‌‘आर्ट ऑफ लिव्हिंग‌’ संस्थेवर 2016 मध्ये यमुना नदीच्या पूरक्षेत्रात एक कार्यक्रम आयोजित करून पर्यावरणीय हानी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी त्यांनी नदीपात्रात स्टेज उभारले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. याबद्दल श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेकडून 5 कोटी रुपयांचा दंड \[…\] The post Sri…

## [Rahul Gandhi : राहुल गांधींनी तरुणींना बोलते केले ! मंचावर समस्या मांडायचे आमंत्रण दिले](https://www.navakal.in/maharashtra/72-rahul-gandhis-young-wife-speaks-banana-invited-to-raise-problem-on-forum/)

_2026-08-23 · Team Navakal · Navakal_

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुण्यात ‌‘छात्रो की गुंज‌’ हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी अनेक तरुणींना बोलते केले. त्यांनी महिलांच्या शिक्षण, करिअर, सुरक्षा, कौटुंबिक वागणूक यासारख्या समस्या, अनुभव कथन करण्यासाठी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित केले. तरुणींनी पहिल्यांदाच इतक्या प्रचंड सभेत आपल्या समस्या बेधडक मांडल्या. त्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, देशातील…

## [ISRO Launch Cost : इस्रोची उपग्रह प्रक्षेपण किंमत अमेरिकेपेक्षा चार पटीने जास्त? केंब्रिज विद्यापीठाच्या अहवालाने वेधले जगाचे लक्ष](https://www.navakal.in/uncategorized/cambridge-university-study-claims-isro-launch-cost-four-times-higher-than-us-marathi-news/)

_2026-08-23 · Team Navakal · Navakal_

ISRO Launch Cost : कमी खर्चात आणि मर्यादित बजेटमध्ये यशस्वी अंतराळ मोहिमा राबवण्यासाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेबाबत (इस्रो) एका आंतरराष्ट्रीय संशोधन अहवालाने मोठा दावा केला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज आणि इटलीच्या पॉलिटेक्निको डी टोरिनो येथील संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधानुसार, कक्षेत उपग्रह पोहोचवण्यासाठी भारताचा प्रति किलोग्रॅम खर्च जगातील प्रमुख अंतराळ…

## [Mumbai Ganesh Murti Collapse: मुंबईत बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत भीषण दुर्घटना! 22 फुटांची &#8216;भुलेश्वरचा राजा&#8217; मूर्ती अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू](https://www.navakal.in/maharashtra/22-foot-ganesh-idol-collapses-during-arrival-in-mumbai-bhuleshwar-two-dead-five-injured-marathi-news/)

_2026-08-23 · Team Navakal · Navakal_

Mumbai Ganesh Murti Collapse: दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने निघालेल्या बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ‘भुलेश्वरचा राजा’ या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी हजारो भाविक जमले असताना, तब्बल 22 फूट उंच असलेली भव्य गणेशमूर्ती अचानक मिरवणुकीत सहभागी नागरिकांच्या अंगावर कोसळली. या भीषण दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन चिमुकल्यांसह…

## [Rahul Gandhi : ‘छात्रों की गूंज’मध्ये घुमला तरुणींचा आवाज;Gen Z पिढी व्यक्त होतेय; पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राजकीय आधाराचीच गरज का भासावी?](https://www.navakal.in/maharashtra/rahul-gandhi-young-womens-voices-resonated-at-chhatron-ki-goonj-gen-z-is-making-itself-heard-but-why-must-students-issues-require-political-backing/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Rahul Gandhi : पुण्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या अनेक तरुणींनी राहुल गांधी यांच्यासमोर आपले प्रश्न आणि अनुभव मांडले. शिक्षण, रोजगार, सार्वजनिक ठिकाणी महिलांना येणाऱ्या अडचणी तसेच महिलांवर लादली जाणारी बंधने याबाबत विद्यार्थीनींनी राहुल गांधी…

## [Rahul Gandhi Pune Event: &#8220;मी तुमच्या सोबत आंदोलनात येतो&#8221;; पुण्यातील &#8216;छात्रों की गूंज&#8217; कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनीने मांडल्या गंभीर व्यथा, राहुल गांधींचे आश्वासन](https://www.navakal.in/desh-videsh/rahul-gandhi-addresses-chhatron-ki-goonj-in-pune-tribal-students-issues-womens-power-speech-news/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Rahul Gandhi Pune Event: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘छात्रों की गूंज’ हा विशेष युवा संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात तरुणाईने आपल्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक अडचणी थेट राहुल गांधींसमोर मांडल्या. या संवाद सत्रादरम्यान निशा नावाच्या आदिवासी विद्यार्थिनीने मांडलेल्या गंभीर…

## [Mount Fuji Child Abandonment: &#8220;थकलोय म्हणून मुलाला 2,000 मीटर उंचीवर एकटे सोडले!&#8221; जपानमधील माऊंट फुजीवर बापाचा धक्कादायक प्रताप](https://www.navakal.in/desh-videsh/father-leaves-seven-year-old-son-alone-on-mount-fuji-reprimanded-by-japan-police-marathi-news/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Mount Fuji Child Abandonment: जपानमधील सर्वोच्च आणि अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या माऊंट फुजी पर्वतावर एका वडिलांनी आपल्या निष्पाप मुलाला धोक्यात टाकल्याची संतापजनक घटना घडली आहे. 7 वर्षांच्या लहान मुलाने चढाईदरम्यान थकल्याची तक्रार केल्यावर, वडिलांनी त्याला अवघ्या एका शीतपेयाची बाटली आणि अल्पोपाहार देऊन 2000 मीटरपेक्षा जास्त उंचीवरील थंड हवेत एकटेच बसवून ठेवले. मुलाला तिथेच सोडून 48 \[…\] The…

## [AI QA that opens fix PRs (Sponsored)](https://crawlproof.com/a/MNWFVSLeTSHe)

_2026-08-22 · **Sponsored**_

Run a browser QA from plain-English instructions; get GitHub issues and optional fix PRs.

## [लक्झरी फीचर्ससह BMW X1 LWB लाँच; किंमत किती? जाणून घ्या](https://www.navakal.in/lekh/bmw-x1-lwb-launched-in-india-price-specifications-features-marathi-news/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

BMW X1 LWB Launch India: लक्झरी वाहन निर्माता बीएमडब्ल्यूने भारतीय ग्राहकांसाठी आपल्या लोकप्रिय एक्स1 या एसयूव्हीचे लांब व्हीलबेस असलेले नवीन मॉडेल अधिकृतपणे बाजारात उतरवले आहे. आरामदायी प्रवासाला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी खास डिझाइन केलेली ही कार 49.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या नवीन लांब व्हीलबेस मॉडेलची किंमत सध्या \[…\] The post…

## [Gautam Gambhir : &#8220;बाहेरच्या टीकेने मला फरक पडत नाही, माझे लक्ष्य फक्त&#8230;&#8221;; भारतीय संघाच्या कामगिरीवर गौतम गंभीरचे चोख प्रत्युत्तर](https://www.navakal.in/krida/gautam-gambhir-press-conference-reply-to-criticism-wtc-ranking-team-india-transition-marathi-news/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Gautam Gambhir Statement: भारतीय कसोटी संघाच्या सलग पराभवांनंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. या टीकेला सामोरे जाताना गंभीर यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. बाहेर कोण काय बोलते किंवा सोशल मीडियावर मिळणारे व्ह्यूज आणि लाईक्स याने आपल्याला काहीही फरक पडत नाही, असे त्यांनी ठामपणे \[…\] The post Gautam Gambhir :…

## [Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईदविरोधात समन्स! हजर न राहिल्यास एनआयए कोर्टात चालणार थेट खटला](https://www.navakal.in/desh-videsh/nia-court-to-issue-summons-to-hafiz-saeed-in-pahalgam-terror-attack-case-marathi-news/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्याविरोधात समन्स जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे समन्स भारताच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत पाठवले जाणार असून त्याला जम्मू येथील विशेष न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले जातील. यापूर्वीच न्यायालयाने…

## [Vaishnavi Hagvane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: फरार आरोपीला आश्रय दिला म्हणजे तो मुख्य गुन्ह्यात सहभागी होत नाही; रिसॉर्ट मालक बंडू फाटक यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा..](https://www.navakal.in/maharashtra/vaishnavi-hagvane-suicide-case-providing-shelter-to-an-absconding-accused-does-not-amount-to-participation-in-the-main-crime-high-court-grants-major-relief-to-resort-owner-bandu-phatak/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Vaishnavi Hagvane : पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेला रिसॉर्ट मालक बंडू फाटक याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुणे सत्र न्यायालयाने फाटक यांना या प्रकरणातील सर्व आरोपांतून दोषमुक्त केले होते. या निर्णयाला पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत राज्य सरकारची याचिका \[…\] The post…

## [Youtuber Beggar Experiment : भिकारी म्हणून पार्ट-टाइम जॉब?&#8221; युट्यूबरने गळ्यात UPI QR कोड अडकवून मागितली भिक्षा; ८ तासांतील कमाई पाहून भल्याभल्यांचे डोळे पांढरे!](https://www.navakal.in/maharashtra/youtubers-beggar-experiment-a-part-time-job-as-a-beggar-a-youtuber-sought-alms-with-a-upi-qr-code-hung-around-his-neck-the-earnings-from-just-eight-hours-left-everyone-wide-eyed-with-astonishment/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Youtuber Beggar Experiment : हरिद्वारमधील कावड मेळ्यात देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक सहभागी होत असतात. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भारलेल्या या मेळ्यात दरवर्षी विविध घटना आणि प्रसंग चर्चेचा विषय ठरतात. यंदा मात्र एका युट्यूबरने केलेल्या अनोख्या प्रयोगाने सोशल मीडियावर विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ‘भिकारी म्हणून पार्ट-टाइम काम केल्यासारखं एका दिवसात किती कमाई होऊ शकते?’ हे \[…\] The post…

## [Rahul Gandhi : राहुल गांधींचा फिटनेस फॉर्म्युला चर्चेत; आंदोलनात खाल्लेल्या ‘त्या’ रोलने वेधलं सगळ्यांचं लक्ष](https://www.navakal.in/desh-videsh/rahul-gandhi-rahul-gandhis-fitness-formula-sparks-discussion-the-roll-he-ate-during-the-protest-grabs-everyones-attention/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Rahul Gandhi : सेलिब्रिटींची जीवनशैली, त्यांचा पेहराव, खानपान आणि फिटनेस याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. आता हीच उत्सुकता राजकीय नेत्यांबाबतही पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी त्यांच्या फिटनेससाठी कायम चर्चेत असतात. त्यांचा साधा पांढरा टी-शर्टही अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यानही राहुल गांधी यांच्या फिटनेसची आणि त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीची…

## [Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; आमदार अब्दुल सत्तारांनी घेतली अंतरवाली सराटीत भेट, २९ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा](https://www.navakal.in/maharashtra/manoj-jarange-patil-manoj-jarange-patil-takes-an-aggressive-stance-on-the-maratha-reservation-issue-mla-abdul-sattar-met-him-at-antarwali-sarati-and-he-has-warned-of-a-hunger-strike-starting-august/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिल्याने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. \[…\] The post Manoj Jarange Patil…

## [Lausanne Diamond League: नीरज चोप्राची वर्षातील सर्वोत्तम कामगिरी! अवघ्या 9 सेंटीमीटरने हुकले सुवर्णपदक; श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने जिंकली स्पर्धा](https://www.navakal.in/krida/lausanne-diamond-league-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%9c-%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Lausanne Diamond League: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने लुझान डायमंड लीग स्पर्धेत दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले आहे. 28 वर्षीय नीरजने या स्पर्धेत 88.05 मीटर अंतरावर भाला फेकत यंदाच्या हंगामातील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. गेल्या एका वर्षाहून अधिक काळातील त्याची ही सर्वात उत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. यापूर्वी जून 2025 मध्ये पॅरिस डायमंड लीग जिंकताना त्याने \[…\] The post Lausanne…

## [FIR : नीट आंदोलनात विद्यार्थ्याचा पेलेटमुळे डोळा निकामी ! राहुल गांधी पोलीस ठाण्यात! 5 तासांनी एफआयआर](https://www.navakal.in/desh-videsh/neet-agitation-failed-due-to-students-pellet-rahul-gandhi-police-station-5-tasani-fir/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

FIR – नीट पेपरफुटी विरोधातील विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून आज वातावरण पुन्हा तापले. या आंदोलनात सहभागी झालेला साहिल लोचाब हा विद्यार्थी 200 पेलेट (छर्रे) लागून गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोळ्यात तीन पेलेट अजूनही असून त्यामुळे त्याची दृष्टी गेल्याचा दावा आहे. मात्र, पोलीस त्याची तक्रार नोंदवून घेत नसल्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज \[…\] The post FIR : नीट…

## [Pension :जवानाच्या अपंगत्व निवृत्तीवेतनावर कर कसा लावता? पत्नीचा सवाल](https://www.navakal.in/desh-videsh/how-does-one-collect-disability-retirement-pension-tax-from-youth-wifes-question/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Pension: युद्धात जखमी झालेल्या जवानाच्या अपंगत्व निवृत्तीवेतनाला ‌‘उत्पन्न‌’ मानून कर लावण्यावर त्याच्या पत्नीने संताप व्यक्त केला आहे. अपंगत्व निवृत्तीवेतन हा नफा किंवा बोनस नसून देशासाठी सैनिकाने केलेल्या त्यागाची शासनाकडून दिली जाणारी भरपाई आहे. त्यावर कर कसा लावता? असा सवाल तिने सरकारला विचारला आहे. लेखक परंजॉय गुहा ठाकुरता यांच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये \[…\] The…

## [Install Manifest V3 Extension (Sponsored)](https://crawlproof.com/a/WI32jTTgO5Xf)

_2026-08-22 · **Sponsored**_

Get this Manifest V3 extension from the official TronBrowser Store listing.

## [Rahul Gandhi Pune Event: पुण्यात राहुल गांधींच्या सभेसाठी गर्दी जमवायला 25 हजारांची ऑफर? ऑडिओ क्लिप शेअर करत भाजपचा गंभीर आरोप](https://www.navakal.in/maharashtra/bjp-alleges-congress-offering-25000-to-influencers-for-rahul-gandhi-pune-event-marathi-news/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Rahul Gandhi Pune Event: पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या राहुल गांधी यांच्या युवा संवाद कार्यक्रमावरून आता जोरदार राजकीय संघर्ष पेटला आहे. काँग्रेस पक्षाकडून तरुण वर्गाचा आणि सोशल मीडियावरील क्रिएटर्सचा पाठिंबा मिळवण्यासाठी थेट पैसे मोजले जात असल्याचा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक कथित ऑडिओ क्लिप \[…\] The post…

## [Super El Nino Global Warming: 100 वर्षांतील सर्वात भयानक &#8216;अल निनो&#8217;चा इशारा! 2027 ठरणार जगातील सर्वाधिक उष्ण वर्ष; भारतीय शेतीवर दुहेरी संकट](https://www.navakal.in/desh-videsh/super-el-nino-threat-2027-likely-hottest-year-impact-on-indian-monsoon-rabi-crops-news/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Super El Nino Global Warming: गेल्या 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधीतील सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक मानला जाणारा अल निनो सध्या प्रशांत महासागरात आकार घेत आहे. ब्रिटनच्या हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा 3 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे. तापमानातील ही वाढ जागतिक हवामान नोंदींमधील सर्व जुने विक्रम मोडीत काढू शकते, ज्यामुळे…

## [Maharashtra FDA Crackdown: मॅकडोनाल्ड्स, केएफसी, रेडिओ क्लबला तुकाराम मुंढेंचा दणका! अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याने परवाने निलंबित](https://www.navakal.in/maharashtra/maharashtra-fda-chief-tukaram-mundhe-suspends-licenses-of-mcdonalds-kfc-radio-club-marathi-news/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Maharashtra FDA Crackdown: राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्न सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि आंतरराष्ट्रीय फूड चेन्सवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्याने दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध रेडिओ क्लब आणि कुलाब्यातील मॅकडोनाल्ड्ससह राज्यातील…

## [Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी पुण्यात हायव्होल्टेज राडा! सीओईपी हॉस्टेलमध्ये विद्यार्थी संघटनांमध्ये तुंबळ हाणामारी; काँग्रेसचा गंभीर आरोप](https://www.navakal.in/maharashtra/rahul-gandhi-pune-visit-clash-between-abvp-nsui-coep-hostel-harshwardhan-sapkal-allegations-news/)

_2026-08-22 · Team Navakal · Navakal_

Rahul Gandhi Pune Visit: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमापूर्वी राजकीय आणि विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. पुण्यातील नामांकित सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वसतिगृह परिसरात काँग्रेसची विद्यार्थी संघटना आणि विरोधी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली. या…

## [पुणेकरांची लाडकी &#8216;MH 12&#8217; पाटी इतिहास जमा होणार? वाहनांच्या गर्दीमुळे आरटीओकडून आता &#8216;MH 61&#8217; चा नवा पर्याय](https://www.navakal.in/maharashtra/pune-rto-to-introduce-mh-61-series-as-mh-12-reaches-final-stage-marathi-news/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Pune RTO MH 61 Series: पुणे शहराची आणि पुणेकरांची स्वतंत्र ओळख मानली जाणारी ‘MH 12’ ही वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या दुचाकींसाठी सुरू असलेली ‘MH 12 ZZ’ ही शेवटची अक्षरी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नवीन वाहनांची नोंदणी विनाअडथळा सुरू राहावी यासाठी \[…\] The post पुणेकरांची लाडकी ‘MH 12’ पाटी इतिहास जमा…

## [School Thik Karo Campaign: जयपूरमध्ये शाळा पाहणीदरम्यान कार्यकर्त्यांवर हल्ला! अभिजीत दिपकेंचा 48 तासांचा अल्टिमेटम अन् धरणे आंदोलनाचा इशारा](https://www.navakal.in/desh-videsh/school-thik-karo-campaign-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a5%80/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

School Thik Karo Campaign: राजस्थानमधील सरकारी शाळांच्या दुरवस्थेवरून सुरू झालेली मोहीम आता तीव्र संघर्षाच्या वळणावर पोहोचली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे सहसंयोजक आशुतोष रांका आणि इतर कार्यकर्ते जयपूर जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर स्थानिक पातळीवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आक्रमक…

## [Chhatrapati Sambhajinagar Hill Suicide Incident: काळीज पिळवटून टाकणारी घटना: मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांसह तिघांचा डोंगरावरून पडून जागीच मृत्यू](https://www.navakal.in/maharashtra/chhatrapati-sambhajinagar-waluj-khavadya-hill-tragic-incident-family-of-three-dies-marathi-news/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Chhatrapati Sambhajinagar Hill Suicide Incident: छत्रपती संभाजीनगर परिसरातील वाळूज एमआयडीसी लगत असलेल्या खवड्या डोंगरावर शुक्रवारी दुपारी एक अत्यंत सुन्न करणारी घटना घडली. कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय मुलाला वाचवण्यासाठी आई-वडिलांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र अखेर एकाच क्षणात संपूर्ण कुटुंब संपले. धुळे-सोलापूर महामार्गालगतच्या उंच कड्यावरून खोल खाणीत खडकावर…

## [Delhi Police Pellet Gun FIR: राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनानंतर अखेर गुन्हा दाखल! पेलेट गनने जखमी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांची कारवाई](https://www.navakal.in/desh-videsh/delhi-police-registers-fir-under-bns-after-rahul-gandhi-dharna-in-pellet-gun-injury-case-marathi-news/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Delhi Police Pellet Gun FIR: नवी दिल्लीतील जंतरमंतर आणि कॅनॉट प्लेस परिसरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गनच्या गोळीबारात जखमी झालेल्या साहिल लोचव या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पीडित विद्यार्थ्याला सोबत घेत ठिय्या आंदोलन केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हा गुन्हा \[…\] The…

## [Imran Khan : तुरुंगातून रुग्णालयात अन् पुन्हा कोठडीत; पाकिस्तानात मध्यरात्री हायव्होलटेज ड्रामा](https://www.navakal.in/desh-videsh/imran-khan-from-prison-to-hospital-and-back-to-cell-midnight-high-voltage-drama-in-pakistan/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना काल (20 ऑगस्ट) गुरुवारी रात्री उशिरा वैद्यकीय तपासणीसाठी इस्लामाबाद येथील शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात रवाना करण्यात आले.​ रुग्णालयात दाखल केल्यानंतर सहा तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने इम्रान खान यांच्या प्रकृतीची सखोल वैद्यकीय तपासणी केली. सर्व आवश्यक…

## [Prince Harry : सहा वर्षांनंतर प्रिन्स हॅरी-मेगन मार्कल ब्रिटनमध्ये परतणार? मुलांसह पुन्हा मायदेशी जाण्याची तयारी](https://www.navakal.in/maharashtra/prince-harry-will-prince-harry-and-meghan-markle-return-to-britain-after-six-years-preparations-underway-to-head-back-to-their-homeland-with-their-children/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Prince Harry : राजेशाहीच्या अधिकृत जबाबदाऱ्यांपासून दूर होत अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल पुन्हा ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या महिन्यात हे दांपत्य आपल्या दोन मुलांसह ब्रिटनला जाण्याची योजना आखत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. मात्र, या वृत्ताला हॅरी यांच्या प्रवक्त्यांकडून किंवा बकिंगहॅम \[…\] The…

## [Ex-Zambian Minister Killed : झांबियात सुरक्षा कारवाईदरम्यान माजी मंत्र्याचा मृत्यू; विरोधी पक्षनेत्याच्या निवासस्थानी छाप्यादरम्यान गोळी लागल्याचा पोलिसांचा दावा](https://www.navakal.in/desh-videsh/ex-zambian-minister-killed-former-zambian-minister-killed-former-minister-dies-during-a-security-operation-in-zambia-police-claim-he-was-shot-during-a-raid-on-the-opposition-leaders-residence/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Ex-Zambian Minister Killed : झांबियात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी राजधानी लुसाका येथे झालेल्या सुरक्षा कारवाईदरम्यान माजी मंत्री मुतोटवे काफवाया यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते ब्रायन मुंडुबिले यांच्याशी संबंधित असलेल्या एका घरावर सुरक्षा दलांनी केलेल्या छाप्यादरम्यान काफवाया यांना गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू…

## [Sunetra Pawar : अजित पवारांच्या निधनावरून वाद, इस्कॉन पदाधिकारी सुनेत्रा पवारांना भेटले; श्रीकृष्णावरील पुस्तके आणि जन्माष्टमीचं निमंत्रण..](https://www.navakal.in/maharashtra/sunetra-pawar-controversy-over-remarks-regarding-ajit-pawars-demise-iskcon-representatives-meet-sunetra-pawar-books-on-lord-krishna-and-an-invitation-to-janmashtami/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Sunetra Pawar : खारघर येथील इस्कॉनचे अध्यक्ष डॉ. सूरदास यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर इस्कॉनच्या पुणे येथील पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीमुळे कालच्या वक्तव्यानंतर चर्चेत आलेल्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. डॉ. सूरदास यांनी अजित पवार यांना इस्कॉनच्या…

## [Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर ट्रस्टमध्ये अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!&#8221; चंपत राय आणि नृपेंद्र मिश्र यांच्यात थेट संघर्ष; ९ पानांच्या पत्राने खळबळ](https://www.navakal.in/desh-videsh/ayodhya-ram-mandir-internal-rift-within-the-ayodhya-ram-mandir-trust-spills-out-into-the-open-direct-conflict-between-champat-rai-and-nripendra-misra-9-page-letter-causes-a-stir/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Ayodhya Ram Mandir : अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपत राय यांनी गुरुवारी नऊ पानांचे एक पत्र जारी केले आहे. या पत्राद्वारे त्यांनी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी (IAS) नृपेंद्र मिश्र यांच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चंपत राय यांनी पत्रात नमूद \[…\] The post Ayodhya Ram Mandir :…

## [Skoda Kylaq चे नवीन मॉडेल लाँच! आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स; पाहा किंमत](https://www.navakal.in/lekh/skoda-kylaq-sportline-variant-launched-in-india-price-features-specifications-marathi-news/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Skoda Kylaq Sportline Launch: भारतीय वाहन बाजारात लोकप्रिय ठरत असलेल्या Skoda Kylaq या एसयूव्ही मालिकेत स्कोडा ऑटो इंडियाने नवीन Sportline मॉडेल सादर केले आहे. किमतीचा विचार केल्यास 6-स्पीड मॅन्युअल पर्यायाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.32 लाख रुपये तर 6-स्पीड ऑटोमॅटिक पर्यायाची किंमत 12.32 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. आता एकूण ७ पर्यायांमध्ये एसयूव्ही उपलब्ध या \[…\] The post Skoda Kylaq…

## [Starlink India Launch: खेड्यापाड्यात पोहोचणार सुपरफास्ट इंटरनेट! स्टारलिंकच्या भारतामधील एन्ट्रीबाबत एलॉन मस्क यांचे मोठे विधान](https://www.navakal.in/desh-videsh/elon-musk-starlink-satellite-internet-india-launch-rural-connectivity-plans-news/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Starlink India Launch: प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवा भारतात सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. सोशल मीडियावरील एका चर्चेदरम्यान मस्क यांनी स्पष्ट केले की, भारतातील ज्या दुर्गम आणि ग्रामीण भागात अद्याप दर्जेदार इंटरनेट पोहोचलेले नाही, अशा लोकांसाठी स्टारलिंक वरदान ठरेल. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात इंटरनेटची घनता \[…\] The…

## [कॉलेज विद्यार्थ्यांसाठी Google ची मोठी भेट! 1 वर्षासाठी मोफत मिळणार Gemini AI चे सबस्क्रिप्शन](https://www.navakal.in/lekh/google-offers-free-ai-plus-subscription-and-400gb-storage-for-college-students-in-india-marathi-news/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Free Google Gemini Subscription : नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात करणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांसाठी गुगलने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास, संशोधन आणि नवनिर्मिती अधिक सुलभ करण्यासाठी गुगल आपले प्रीमियम एआय प्लस सबस्क्रिप्शन पूर्ण 1 वर्षासाठी मोफत देत आहे. या विशेष सुविधेमुळे विद्यार्थ्यांना सामान्य युजर्सच्या तुलनेत जेमिनीचा दुप्पट वापर करण्याची मर्यादा आणि मोठ्या प्रमाणावर…

## [Ajit Pawar : श्रीमद्‌‍ भागवत न वाचल्यामुळेच अजित पवारांचा अपघाती मृत्यू](https://www.navakal.in/maharashtra/ajit-pawar-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a5%8d-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a4-%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a5%8d/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबाबत इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदास यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. श्रीमद्‌‍ भागवत ग्रंथाचे वाचन केल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत. अजित पवार यांना मी श्रीमद्‌‍ भागवत ग्रंथ दिला होता. मात्र त्यांनी तो वाचला नसावा. त्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू झाला, असा अजब दावा सूरदास यांनी केला आहे. \[…\] The post Ajit Pawar : श्रीमद्‌‍ भागवत न…

## [Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचे आता खाद्यतेलाकडे लक्ष! नोटीस जारी ! सुटे तेल, पुनर्वापराचे तेल, गंजलेले डबे याला सक्त बंदी](https://www.navakal.in/maharashtra/tukaram-mundhe-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a2%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Tukaram Mundhe : अन्न आणि औषध खात्याचे कमिशनर तुकाराम मुंढे यांनी आता खाद्यतेलाकडे आपली वक्रदृष्टी फिरवली आहे. आजच त्यांनी खाद्यतेलाबाबत नोटीस जारी केलेली असून, जो नियमांचे उल्लघंन करेल, तो उत्पादक, विक्रेता, व्यवस्थापक या सर्वांवर कारवाई होऊन 7 वर्षांपासून ते आजन्म कैद आणि 3 ते 10 लाख दंड अशी सजा ठोठावण्यात येईल. तुकाराम मुंढे यांनी आज \[…\] The post Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचे आता…

## [Maharashtra Court Employees Strike: राज्यातील न्यायालयांमधील 34,500 कर्मचारी आक्रमक! समान वेतनासाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक](https://www.navakal.in/maharashtra/maharashtra-subordinate-court-employees-statewide-agitation-for-pay-parity-with-bombay-high-court-marathi-news/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

Maharashtra Court Employees Strike: मुंबई उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सेवाशर्ती लागू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ न्यायालयांमधील कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत. पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यातील सुमारे 34,500 न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, मागण्या मान्य न झाल्यास थेट बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. गेल्या अनेक…

## [PNG Connection Scheme: गॅस सिलिंडरच्या बुकिंगचा त्रास संपणार! पाईप गॅस जोडणीसाठी केंद्र सरकारची 1 सप्टेंबरपासून मोठी योजना](https://www.navakal.in/desh-videsh/central-government-launches-domestic-png-incentive-scheme-from-september-1-marathi-news/)

_2026-08-21 · Team Navakal · Navakal_

PNG Connection Scheme: घरोघरी पाईपलाईनद्वारे थेट स्वयंपाकाचा गॅस पोहोचवण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना आखली आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून घरगुती पाईप गॅस जोडणीसाठी विशेष प्रोत्साहन योजना लागू केली जाणार आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश एलपीजी सिलिंडरवरील परावलंबित्व कमी करणे आणि स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे हा आहे. शहरांमधील गॅस वितरण कंपन्यांना त्यांच्या \[…\] The post…

