RSS Amplifier

News source

Pune Prime News

Latest News in Marathi

puneprimenews.comSource feed ↗40 articles

Live Last read · last published · next check

Written by

Latest articles

मांजरीत डंपरची दुचाकीला धडक; चाकाखाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

लोणी काळभोर : मांजरी–महादेवनगर–मांजरी रस्त्यावर डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण डंपरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. अमीत रमेश अवताडे (वय 22, रा. गोपाळपट्टी, मांजरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास मोंटा मार्टसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. डंपर मांजरीच्या दिशेने जात असताना अमीतही दुचाकीवरून त्याच दिशेने जात होता. त्यावेळी दुचाकीला…

यवत बाजारतळावर ‘कल्याण मटका’चा पर्दाफाश; दोघे जेरबंद, 7 हजार 50 रुपयांची रोकड जप्त

यवत : यवत बाजारतळ परिसरात सुरू असलेल्या कथित ‘कल्याण मटका’ जुगार अड्ड्यावर यवत पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत 7 हजार 50 रुपयांची रोकड, चिठ्ठ्यांचे बुक आणि बॉलपेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. यवत पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला बाजारतळ परिसरात दोन व्यक्ती चिठ्ठ्यांवर आकडे लिहून नागरिकांकडून पैसे घेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. […]

मेट्रो आली; कोंडी वाढली! आता LRTचा विचार तरी करा:निवृत्त कर्नल सुरेश पाटील

पुणे : पुण्यात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वर्षानुवर्षे नवे प्रकल्प, नवे आराखडे आणि नवी आश्वासने दिली जात असली, तरी रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढत आहे. मेट्रोसाठी रस्ता अरुंद झाला आणि त्याच मार्गावर वाढीव एफएसआयमुळे टॉवर उभे राहत असतील, तर उद्याची वाहतूक नेमकी कुठे धावणार? हा प्रश्न आता राज्यकर्ते आणि प्रशासनाने गांभीर्याने विचारण्याची वेळ आली […]

गेट बंद करून 100 झाडांची कत्तल? नांदूरच्या चेरी कंपनीवर गंभीर आरोप; पोलीस-वनाधिकाऱ्यांनाही ‘नो एन्ट्री’!

दौंड : नांदूर (ता. दौंड) येथील चेरी कंपनीच्या आवारात गेट बंद करून सुमारे 70 ते 100 मोठ्या वृक्षांची बेकायदा तोड केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता. 22) उघडकीस आला. विशेष म्हणजे वृक्षतोडीची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले.मात्र कंपनीचे गेट उघडण्यात न आल्याने अधिकाऱ्यांना संरक्षक भिंतीवरून उडी मारून कंपनीच्या आवारात प्रवेश करावा लागला […]

लोणी स्टेशन चौकात रस्त्यावर धोकादायक पार्किंग केल्याप्रकरणी चालकांवर गुन्हा दाखल

लोणी काळभोर : लोणी स्टेशन चौकातील सर्व्हिस रोडवर कार रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (ता. 21 ) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कारवाई केली. या प्रकारामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. नदिम नासीर शेख (वय 30, रा. कोंढवा, पुणे) असे […]

नव्या घराच्या बांधकामाचा राग अनावर!तरुणाच्या डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला, तरुण गंभीर जखमी

लोणी काळभोर : नवीन घराच्या बांधकामावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून तरुणाला शिवीगाळ करत डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना मांजरी बु. (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी परिसरात 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास येथे घडली. या घटनेत अभिजीत बाळू गायकवाड (वय 21 ) हा जखमी झाला असून त्याच्यावर […]

भेकराईनगरमध्ये भरधाव मिक्सर ट्रकची दुचाकीला धडक; 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू

फुरसुंगी : भेकराईनगर बस डेपोसमोर भरधाव आणि बेदरकारपणे चालविलेल्या मिक्सर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना भेकराईनगर बस डेपोसमोर 21 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. राधेकृष्ण घुरण यादव (वय 23 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात त्याच्यासोबत असलेला तपन महाटु किरकोळ जखमी झाला. […]

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात! 5 वाहनांची जोरदार धडक; 4 कारचा चुरडा तर 10 जण जखमी

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भाताण बोगद्याजवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान बसने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोर असलेल्या चार वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये तीन चारचाकी गाड्या आणि एका टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे . या विचित्र अपघातात 8 ते 10 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, […]

पुण्यात गणेशोत्सवात DJचा दणदणाट कमी होणार! प्लाझ्मा अन् प्रेशर मीडियावर बंदी; पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत आहे. यंदाच्या उत्सवात डीजे साऊंड सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘प्लाझ्मा’ आणि ‘प्रेशर मिड’ या उपकरणांवर पूर्णपणे बंदी घालण्याची जोरदार मागणी पुणे शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी केली आहे. या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त…

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी पैसे देऊन मुलं आणली? मुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप

पुणे : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून महाराष्ट्रात मोठे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमासाठी पैसे देऊन मुलं आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन […]

ताम्हिणी घाटातील दरडींच्या त्रासाला कायमचा पूर्णविराम! १० किलोमीटरचा बोगदा उभारण्याचा मोठा निर्णय

पुणे : पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातील प्रवास पावसाळ्यात अधिक धोकादायक ठरत असल्याने आता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा विचार सुरू झाला आहे. घाटातील दरडी कोसळण्याचा धोका असलेला भाग टाळण्यासाठी सुमारे 10 किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती आहे. यंदाच्या पावसाळ्यात ताम्हिणी […]

‘अगं प्लिज दार उघड’ मुलाने गळफास घेतला तर आईच्या गळ्यावर काळे डाग; दार उघडताच पतीने पाहिलं भयानक दृश्य

बारामती: बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर परिसरात शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी माय-लेकाचा दुर्दैवी आणि संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय विवेक विजय गावडे हा घरातील अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर त्याची ४१ वर्षीय आई रमा विजय गावडे ही घरातील खिडकीजवळ मृतावस्थेत आढळून आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ […]

वैष्णवी हगवणे प्रकरणात नवं वळण! फरार आरोपीला जेवण आणि निवारा दिल्याप्रकरणी मोठी घडामोड

पुणे: पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि रिसॉर्ट मालक बंडू फाटक यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुणे सत्र न्यायालयाने बंडू फाटक यांना या प्रकरणातून दोषमुक्त केले होते. या निर्णयाला पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. […]

खुनाचा कट रचून नातेवाईक महिलेची हत्या; दोघांना जन्मठेप

पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेबोल्हाई, खुटाळे वस्ती येथे २०१६ मध्ये झालेल्या ६० वर्षीय मंगी लालचंद भोसले यांच्या खूनप्रकरणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. भा.दं.वि. कलम ३०२, १२०(ब) आणि ३४ अन्वये ही शिक्षा सुनावण्यात आली. मंगी लालचंद भोसले यांचा २५ जून २०१६ रोजी पहाटेच्या सुमारास डोक्यात गंभीर दुखापत […]

इंदापूर पोलिसांची गुटख्याविरोधात धडक कारवाई; २३.८७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

आदित्य बोराटे इंदापूर: प्रतिबंधित गुटख्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर इंदापूर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत १५ लाख ८७ हजार ६४० रुपयांचा विमल गुटखा आणि ८ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन, असा एकूण २३ लाख ८७ हजार ६४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालक आजमखान महमूद पठाण (रा. सरस्वतीनगर, इंदापूर) याला अटक […]

पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी संघर्ष टोकाला! चंद्रकांत पाटलांविरोधातील पत्राचे पडसाद थेट निधी कपातीवर

पुणे : पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी भाजप नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात महापालिकेत मांडलेल्या पत्राला नगरसेवक सुहास टिंगरे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्यानंतर भाजपकडून टिंगरे यांच्याही निधीवर कारवाई झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.…

उरुळी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्या; उरुळी कांचन प्रवासी संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निवेदन; लोणावळा-दौंड लोकल डिसेंबर 2026 पर्यंत सुरू करण्याची मागणी..

उरुळी कांचन, (पुणे) : मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उरुळी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना कायमस्वरूपी 2 मिनिटांचा थांबा देण्यात यावा, तसेच लोणावळा ते दौंड उपनगरीय (लोकल) रेल्वे सेवा डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ववत सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी उरुळी कांचन प्रवासी संघाच्या वतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पत्र पाठवून साकडे घालण्यात आले […]

आंबेगावातील अंगणवाडी सेविकेचे निलंबन अखेर मागे; प्रशासनाकडून आदेश मागे

पुणे : लहान मुले आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराविरोधात सोशल मीडियावर आवाज उठवणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई अखेर जिल्हा प्रशासनाने मागे घेतली आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर सोशल मीडियावरून प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तसेच विविध कामगार संघटनांनीही या कारवाईविरोधात आवाज उठवला होता. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील…

खवड्या डोंगरावर मुलाला वाचवताना वडील कोसळले, पाठोपाठ आईनेही घेतली उडी; तिघांचा अंत

छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या दुर्घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण डोंगरावरून खाली कोसळल्यानंतर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचे वडीलही खाली पडल्याचे दिसत आहे. त्यानंतर मुलाला वाचवण्यासाठी आईनेही खाली उडी घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. काही क्षणांत…

‘आज जिवंत सोडणार नाही!’ दौंडमध्ये पतीसह त्याच्या मित्राचा महिलेवर चाकूने हल्ला

दौंड, ता. 21 : पतीपासून विभक्त राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिला निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर पतीने मित्राच्या मदतीने तिच्यावर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी परिसरात बुधवारी (ता.19) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. महिलेच्या गळ्यावर चाकू फिरवल्याने ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर […]

आव्हाळवाडीत रंगकाम करणाऱ्या कामगाराचा डोक्यात वार करून खून ; दोन संशयित आरोपी फरार

वाघोली, ता. 21 : आव्हाळवाडी येथे इमारतीत रंगकाम करण्यासाठी आलेल्या कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका कामगाराचा डोक्यात कठीण वस्तूने वार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन सहकारी कामगारांविरोधात वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघेही घटनास्थळावरून फरार झाले आहेत. ही घटना बुधवारी (ता. 19) रात्री साडेदहा ते 20 ऑगस्ट […]

दौंड तालुक्यात ट्रॅक्टर अडवून चालकाला मारहाण; भाजी कापण्याच्या चाकूने गळ्यावर वार

दौंड, ता. 21 : मुलाने भाचीला दुसऱ्या तरुणासोबत पळवून नेल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने ट्रॅक्टर अडवून चालकाला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच भाजीपाला कापण्याच्या चाकूने गळ्यावर वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना नानगाव (ता. दौंड) येथे गुरुवारी (ता. 20) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

चाकण आणि पुणे जिल्ह्यातील उद्योगांचे टेन्शन मिटणार; जिल्हाधिकारी कार्यालयात थेट ‘उद्योग तक्रार निवारण कक्ष’ स्थापन

पुणे : चाकणसह पुणे जिल्ह्यात नवीन उद्योग आणि जागतिक क्षमता केंद्रे (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स-जीसीसी) मोठ्या प्रमाणावर येत आहेत. मात्र, सध्याच्या उद्योगांना विविध सरकारी विभागांकडून आवश्यक मान्यता, परवानग्या आणि सेवा मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा या कामांसाठी महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने उद्योगांच्या समस्या आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी…

पालकांनो, ही संधी सोडू नका! पुण्यात तब्बल ८ लाख मुलींचे भविष्य होणार सुरक्षित; सरकारची मोठी योजना

पुणे: मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. लेक लाडकी योजना आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या योजनांमुळे मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक बचतीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. पुणे विभागातील पालकांनी आपल्या पात्र मुलींची केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत खाती उघडावीत, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे उपआयुक्त जे. बी. गिरासे…

निकृष्ट आहाराची पोलखोल केली अन् नोकरी गेली! आंबेगावातील अंगणवाडी सेविकेचं तडकाफडकी निलंबन; पहा Video

पुणे: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर प्रशासनाने कारवाई केली आहे. रेश्मा पारधी यांनी पोषण आहाराच्या दर्जाबाबत आक्षेप नोंदवत हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांच्यावर सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आली आहे. शासकीय…

एकाच तरुणीचे २ गुंड बॉयफ्रेंड! लव्ह ट्रँगल, दीड किलोमीटर पाठलाग अन् प्रेमाचा रक्तरंजित थरार; पहा व्हायरल व्हिडिओ

नागपूर: नागपूरमधील नरेंद्र नगर येथील सुंदरबन अंडरपासजवळ प्रेमप्रकरणातील वादातून दोन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांमध्ये भररस्त्यात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत गौरव रगडे (वय २७) याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गौरव प्रभाकर राऊत आणि त्याचा साथीदार दीपक वासनिक या दोघांना अटक केली आहे. गौरव रगडे याचे गेल्या दोन वर्षांपासून सपना नावाच्या तरुणीशी […]

फोटो पाहून तिच्या प्रेमात पडला! मैत्री करत हॉटेलवर नेलं अन् तरुणाने तिला दारू पाजून केलं भयंकर कृत्य

कोल्हापूर: सोशल मीडियावरील फोटो पाहून गायिकेचा मोबाईल नंबर मिळवला आणि थेट फोन केल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. पुढे लग्नाचे आश्वासन देत जवळीक वाढवून हॉटेलमध्ये नेले. तिथे मद्यपान केल्यानंतर तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप कोल्हापुरातील एका तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अक्षय भरत फाळके (वय 33, रा. उजळाईवाडी, ता. करवीर) याला अटक केली आहे. […]

शेवाळेवाडीत मुलगा होत नाही म्हणून पत्नीचा गळा आवळला; मांजरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टोणे याच्यावर गुन्हा

डॉ. अशोक बालगुडे पुणे, ता 21: ‘मुलगा होत नाही’ या कारणावरून पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्यांच्या आई अनसूया रंगराव टोणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या इच्छेविरुद्ध बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करून गर्भात मुलगी असल्याचे […]

सोन्या -चांदीच्या दरात भडका! 24 तासांत सोनं ₹4,500 तर चांदी ₹11,000 महाग; भाववाढीमागचं कारण समोर

पुणे : मागील आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्यातील राजकीय व युद्धजन्य तणाव कमी झाला आहे. याचे थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर दिसून आला असून डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाली आहे. डॉलर कमजोर झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळत आहे. स्थानिक बाजारात गेल्या 24 तासांत मौल्यवान धातूंच्या किमतीत प्रचंड […]

हडपसरमधील अमृता वाईनसमोर तुफान राडा! ‘तुला गोळ्या घालून जेलमध्ये जाईल’ धमकी देत तरुणावर टोळक्याचा हल्ला

हडपसर, ता. 21 : जुन्या वादातून हडपसरमधील अमृता वाईनसमोर एका 25 वर्षीय तरुणावर चौघांनी शिवीगाळ करत लाकडी बांबूने डोक्यात मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. 20) रात्री घडली. हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला, तर चेहऱ्यावर फाईट मारल्याने पुढील दात अर्धवट तुटल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी मुख्य आरोपीने ‘गोळ्या घालतो’ अशी धमकी दिल्याचा […]

भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! आता सुटे खाद्यतेल विक्रीवरही निर्बंध; एफडीएची कडक मोहीम

पुणे, ता. 20 : भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात कारवाईचा वेग वाढवला आहे. भेसळयुक्त पनीर, दूध, हॉटेल-रेस्टॉरंटमधील निकृष्ट खाद्यपदार्थ आणि शाळांमधील खाद्यपदार्थांच्या तपासणीनंतर आता खाद्यतेल विक्रीकडे एफडीएने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत खाद्यतेलाबाबत नव्या नियमांची…

‘आता पुढचा नंबर कोणाचा?’ पीएमआरडीएच्या कारवाईने लोणी काळभोरमधील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले; प्लॉटिंग-होर्डिंग चालकांमध्ये भरली धडकी!

लोणी काळभोर, ता. २० : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील अनधिकृत बांधकामांविरोधात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुरू केलेली कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिली. उद्योजक हेमंत सोपान हाडके यांच्या सुमारे ४२ हजार चौरस फुटांच्या कथित अनधिकृत बांधकामावर बुधवारी (दि. १९) कारवाई केल्यानंतर गुरुवारी (दि. २०) हाडके यांच्यासह रवींद्र घोरपडे यांच्या सुमारे ५ हजार चौरस […]

बोरीभडक येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू; साप चावल्याचे लक्षात न आल्याने घडली घटना..

उरुळी कांचन, (पुणे) : शेतात ऊसतोड व वाहतूक करत असताना मण्यार या अत्यंत विषारी सापाने दंश केल्याने बोरीभडक येथील एका 30 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नितीन संजय शेंबडे (वय 30, रा. बोरीभडक, ता. दौंड) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. सुरुवातीला साप चावल्याचे लक्षात न आल्याने उपचाराला उशीर झाला आणि गुरुवारी (ता. 20) […]

महागड्या गाड्या, कपडे अन् इंस्टाग्रामच्या फोटोवरून भाऊच भावावर जळायचा! फोटो काढायच्या बहाण्याने बोलावलं अन् केला गेम…

पुणे: रात्रीच्या अंधारात मोकळ्या मैदानात १७ वर्षीय तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. डोळा आणि कवटीजवळ गंभीर जखमा होत्या. जवळच त्याची दुचाकी होती; मात्र मोबाइल आणि दुचाकीची चावी गायब होती. सुरुवातीला गोळीबार करून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र हत्यार कोणते, खून कोणी केला आणि त्यामागचे कारण काय, याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. अखेर […]

शिरूरमध्ये सावकाराचा कारनामा! कर्ज फेडलं नाही म्हणून महिलेवरच टाकला हात; सावकाराविरोधात गुन्हा दाखल

न्हावरे: कर्जाच्या पैशांची परतफेड न झाल्यामुळे कापड दुकानदार महिलेचा विनयभंग करण्यात आला. तसेच महिलेच्या पतीला मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी वडगाव रासाई (ता.शिरूर) येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भाऊसाहेब दामोदर वाबळे, जया भाऊसाहेब वाबळे आणि प्रेम ऊर्फ भैय्या भाऊसाहेब वाबळे सर्व जण […]

महिला पोलीस अधिकाऱ्यानेच केला कैद्याला अर्धनग्न व्हिडीओ कॉल! जेलमध्येच वेश्याव्यवसायाचा आरोप; कैद्यांकडून पैसे घेऊन करायचे किळसवाणे प्रकार

बेळगाव : गांजा, मोबाईल सापडणे आणि कैद्यांमधील हाणामारी अशा विविध घटनांमुळे चर्चेत असलेल्या बेळगावच्या हिंडलगा कारागृहातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने कैद्याकडून 40 हजार रुपये लाच स्वीकारून त्याच्याशी अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित घटना दोन वर्षांपूर्वीची असून, त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला […]

‘श्रीमद्भागवत वाचली असती तर अजित पवार वाचले असते’ इस्कॉन अध्यक्ष्यांच्या धक्कादायक दाव्याने खळबळ

पुणे : राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथाचे संपूर्णपणे वाचन करून तो जीवनात आचरणात आणणाऱ्या व्यक्तीचा अपघाती किंवा अकाली मृत्यू होत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. मागील आषाढी एकादशीला डॉ. सूरदासजी यांनी अजित पवार यांची भेट घेऊन […]

पुण्यात खळबळ! प्रसूतीदरम्यान ३७ वर्षीय महिला आणि नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : प्रसूतीसाठी मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ३७ वर्षीय महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेचे नाव रूपाली सोमनाथ इंदलकर (वय ३७, रा. कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) असे आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे महिला आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. रूपाली […]

पुण्यात २० कोटींचा महा-भिशी घोटाळा! दामदुप्पट आमिष दाखवून ३९ जणांची फसवणूक; ३ महिलांसह ५ जणांवर गुन्हा

पुणे : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे बेकायदेशीरपणे भिशी चालवून गुंतवणुकीची रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत सुमारे 39 जणांकडून 20 कोटींहून अधिक रक्कम जमा करून तिचा कथित अपहार केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तीन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सुलभा शरद नवले (वय 50), नितीन शरद नवले (वय […]

ATM मधून पैसे काढून तो बाहेर पडला अन् तेवढ्यात ५ दरोडेखोरांनी रस्ता अडवला! पिस्तूल दाखवत धमकी दिली अन्…

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये एटीएममधून पैसे काढून बाहेर पडलेल्या पिकअप चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच अट्टल दरोडेखोरांना गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराबवाडी येथे १० ऑगस्ट २०२६ रोजी ही घटना घडली होती. एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून १ लाख […]