RSS Amplifier

News source

Prahaar.in

Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live

prahaar.inSource feed ↗20 articles

Overdue Last read · last published · next check
Last read 3 hours ago, longer than this feed's 1 hour schedule.

Latest articles

Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचा PR कॅमेऱ्यावर उघडा पडला’; पुण्याच्या कार्यक्रमासाठी इन्फ्लुएन्सर्सना २५,००० रुपये वाटल्याचा भाजपचा आरोप

पुणे : पुण्यात २२ ऑगस्ट रोजी आयोजित राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून मोठा राजकीय वाद पेटला आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, या कार्यक्रमाला गर्दी दाखवण्यासाठी आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काँग्रेसकडून इन्फ्लुएन्सर्सना (Influencers) प्रत्येकी २५ हजार रुपये दिले जात आहेत. व्हिडिओ शेअर करत भाजपकडून जोरदार हल्लाबोल 𝐄𝐯𝐞𝐧…

Ahilyanagar Crime : घरासमोर लावली गांजाची झाडे, 64.73 किलो वजनाचा गांजा जप्त

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील धनगरवाडी (Dhangarwadi) येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धनगरवाडी येथे चक्क घरासमोर अवैधरित्या गांजाची झाडे लावण्यात आली होती. एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) या गांजा लागवड करणार्‍या व्यक्तीविरूध्द कारवाई केली असून या कारवाईत तीन लाख 23 हजार 650 रूपये किमतीचा 64.73 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. तर याप्रकरणी अनिल लक्ष्मण विरकर (वय 49, रा.…

Amit Shah : शेतकरी, तरुण अन् महिलांसाठी मोठ्या घोषणा! सिलीगुडीत तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या प्रदर्शनाला गृहमंत्री अमित शाहंची भेट

सिलीगुडी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पश्चिम बंगालमधील (West Bengal) सिलीगुडी (Siligudi) येथे 'तीन नवीन फौजदारी कायद्यां'वर (New Criminal Laws) आयोजित केलेल्या एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. या कार्यक्रमादरम्यान आयोजित सभेत बोलताना त्यांनी केंद्रातील सरकारच्या सुरुवातीच्या १०० दिवसांतील विविध महत्त्वाकांक्षी निर्णय, विकासकामे आणि नागरिकांच्या कल्याणासाठी राबवलेल्या योजनांचा…

Anna Bansode : वांद्रेतील डिजिटल जाहिरात फलकांची चौकशी; ७ दिवसांत बैठक घेण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील टीचर्स कॉलनी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील एमएसआरडीसीच्या फुट ओव्हर ब्रिजवरील डिजिटल एलईडी जाहिरात फलकांची परवानगी, वैधता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सखोल चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. विधानभवन येथे अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुंबई महानगरपालिका, एमएसआरडीसी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित…

Ashish Shelar : आदित्य ठाकरेंचा 'दिमागी' नक्षलींशी संवाद वाढलाय?

- मंत्री आशिष शेलार यांचा घणाघात; गणेशोत्सवातील परंपरांवर आक्षेप घेत मर्यादा आणण्याचा प्रयत्न मुंबई : गणेशमूर्ती तयार करण्यापासून ते सजावट, रोषणाई, विसर्जन आणि उत्सवाच्या विविध परंपरांवर सातत्याने आक्षेप घेत मर्यादा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींपासून मुंबईकरांनी सावध राहावे. अशा पद्धतीने आक्षेप घेणाऱ्या 'दिमागी नक्षलीं'सोबत उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा संवाद वाढलाय का, असा सवाल भाजप…

Jalgaon Crime : धनादेश बाउन्स...पाचोऱ्यात कापूस व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांना गंडा, १.६३ कोटींची फसवणूक

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) तालुक्यात कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची तब्बल १ कोटी ६३ लाख ४६ हजार ८१० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कापूस खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना रोख रक्कम न देता धनादेश (Cheque) देण्यात आले. मात्र, हे धनादेश बँकेत जमा केल्यानंतर बाउन्स (Cheque Bounce) झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी हरिदास मोहनलाल ठक्कर,…

Virar Alibaug Corridor : विरार-अलिबाग कॉरिडॉर : शेतकऱ्यांच्या जमिनींचे सक्तीचे भूसंपादन तातडीने स्थगित करा- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : विरार-अलिबाग (Virar-Alibuag) बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे सुरू असलेले सक्तीचे भूसंपादन तातडीने स्थगित करण्यात यावे, अशी ठाम भूमिका भाजप आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur) यांनी घेतली आहे. जोपर्यंत बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याबाबत शासन स्तरावर अंतिम आणि न्याय्य निर्णय होत नाही, तोपर्यंत भूसंपादनाची कोणतीही पुढील कार्यवाही…

Jyoti Waghmare : पहिल्याच अधिवेशनानंतर खासदार ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारकडून महिला व बालविकास मंत्रालय समितीवर निवड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वीकारले पत्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शिवसेना खासदार डॉ. ज्योती नागनाथ वाघमारे यांची महिला व बालविकास मंत्रालयाच्या अत्यंत महत्त्वाच्या सल्लागार समितीवर (Consultative Committee) सदस्य म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. पहिल्याच संसदीय अधिवेशनानंतर डॉ. वाघमारे यांना मिळालेली ही मोठी जबाबदारी त्यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. भारताच्या…

Mumbai Powai News : दृष्ट काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला अन्...; पवईत तृतीयपंथीयाचे सोंग घेऊन महिलेवर अत्याचार!

मुंबई : मध्य मुंबईतील पवई परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. घरातील वाईट नजर आणि दृष्ट काढण्याच्या बहाण्याने तृतीयपंथीयाचे रूप धारण करून एका घरात शिरलेल्या नराधमाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या आहेत. दृष्ट काढण्याच्या बहाण्याने बेडरूममध्ये प्रवेश मिळालेल्या…

Jalgaon : २६/११च्या सहा पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात अनुपस्थितीत खटल्याची प्रक्रिया सुरू, ॲड. उज्ज्वल निकम यांची माहिती

Jalgaon : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी फरार असलेल्या सहा पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात आता भारतातच महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. हाफिज सईद (Hafiz Saeed), झकी-उर-रहमान लखवी (Zaki-ur-Rahman Lakhvi) आणि साजिद मीर (Sajid Mir) यांच्यासह सहा आरोपींविरोधात त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती विशेष सरकारी वकील आणि राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम…

चित्रपट निर्मितीचा मोह या मराठी अभिनेत्याला महागात पडला; नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते विजय निकम यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमा व मालिकांमध्ये भूमिका साकारत इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे. विजय यांनी ५५ वर्ष पालिकेत नोकरी केली. मात्र, सिनेमामुळे त्यांनी सर्व काही गमावलं. विजय यांनी आई आणि बायकोचे दागिने विकले, शेतजमीनही विकली. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विजय यांनी त्यांच्या या संघर्षाबद्दल सांगितलं आहे. (Vijay Nikam) एका…

Yaad Lagla Song Release : आकाश यादव - पूजा चव्हाण यांचं “याड लागलं” हे रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर मिळतेय प्रेक्षकांची पसंती!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक मनमोहक नविन गाणं “याड लागलं” प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रेक्षकांना एक ताजं आणि हृदयस्पर्शी संगीत अनुभव देण्याचे वचन देतं. गाण्यात “पुन्हा कर्तव्य आहे” या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा चव्हाण आणि अभिनेता आकाश यादव यांची नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. समाधान पवार, सुबोध गोतपागर, शुभम यादव, आकाश यादव यांनी या गाण्याची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. या…

Ahilyanagar Crime News : एसटी कर्मचाऱ्याचे अपहरण करून लूट, दोघे ताब्यात

Ahilyanagar Crime News : पुणे बसस्थानक परिसरातून एसटी महामंडळातील लिपिकाचे अपहरण करून निर्जनस्थळी नेत मारहाण करत लूट केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत कोतवाली पोलिसांच्या (Kotwali Police) गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत दोन संशयित आरोपींना सावेडी परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून लुटीतील मोबाईल, रोकड आणि दुचाकीसह सुमारे ७२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अभिषेक…

Strict move by FDA : सुट्या खाद्यतेलाची विक्री बंद, 'एफडीए' चे १४ कलमी आदेश; तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी

मुंबई : नागरिकांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर नियम लागू केले आहेत. खाद्यतेलाच्या पुरवठा साखळीत होणारी भेसळ, पुनर्वापर आणि असुरक्षित हाताळणी पूर्णपणे रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने १४ कलमी सर्वसमावेशक आदेश जारी केला आहे. या नव्या आदेशानुसार आता राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली असून, हा आदेश…

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न 'टीस'च्या अहवालानंतर दोन महिन्यात मार्गी लावणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मंत्री नितेश राणे यांच्यासोबत विशेष बैठक मुंबई : वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांच्या प्रलंबित नुकसान भरपाईबाबत निकष ठरवण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडून (टीझ) सविस्तर अभ्यास केला जात आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन महिन्यात मच्छीमारांना भरीव नुकसान भरपाई देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री…

Narayana Murthy : नारायण मूर्ती यांनी आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी सुद्धा मूर्तींसह दिली व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हे भगवान व्यंकटेश्वरांना समर्पित आहे, ज्यांना भगवान विष्णूचे एक पूजनीय रूप मानले जाते. या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. नारायण मूर्ती यांची ही भेट गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या ८० व्या…

Crime News : ‘तू घरी बसून फुकट खातेस’ म्हणत पत्नीला त्रास, उपरण्याने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न

Crime News : ‘माझ्या मामाच्या मुलीशी लग्न केले असते तर मला खूप पैसे मिळाले असते. तू घरी बसून फुकट खातेस,’ असे म्हणत पत्नीला मानसिक त्रास देणाऱ्या पतीने कापडी उपरण्याने तिच्या गळ्याला फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कासोदा (ता. एरंडोल) येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पती निलेश भगवान पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. (Crime…

Ashish Shelar : महात्मा ज्योतिबा फुले यांचे समग्र वाङ्मय सात भाषांमध्ये अनुवादित होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या समग्र वाङ्मयाचा सात भाषांमध्ये अनुवाद करण्यात येणार आहे. हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा या भाषांमध्ये हा ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. (Ashish Shelar) सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत…

Nitesh Rane : मासेमारी बंदी कालावधीत मच्छिमारांना मिळणार आर्थिक मदत

- मत्स्य विभागाचा वित्त विभागाकडे प्रस्ताव; ८ हजार ८२९ मच्छीमार कुटुंबांना होणार लाभ मुंबई : पावसाळ्यात दोन ते अडीच महिन्यांच्या मासेमारी बंदीच्या काळात मच्छीमार कुटुंबांसमोर निर्माण होणारा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विशेष नियोजन केले आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील गरजू मच्छीमारांना प्रत्येकी २० हजार रुपयांची…

Maharashtra Politics : ‘पक्ष आणि चिन्ह गोठवणाऱ्यांनी विचारही गोठवावेत का?’; शिवसेनेचे व्यंगचित्रातून उबाठा गटावर टीकास्त्र

मुंबई : शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. उबाठा गटाच्या या भूमिकेवर शिवसेनेने सोशल मीडियावर एक व्यंगचित्र प्रसिद्ध करत टीका केली आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मुद्दा उपस्थित करत उबाठा गटाला लक्ष्य करण्यात आले आहे. (Shiv Sena) शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे…