RSS Amplifier

News source

पांचजन्य

वृत्तपत्र

panchjanya.inSource feed ↗20 articles

Live Last read · last published · next check

Written by

Latest articles

चर्चा प्रभासच्या रौद्रावताराची

अभिनेता प्रभासच्या आगामी ‌‘फौजी‌’ चित्रपटाचा दमदार पहिला लूक समोर आला असून, समाजमाध्यमांवर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टरमध्ये प्रभास अनवाणी पायांनी पुढे जाताना दिसत आहे. अंगावर रक्ताचे डाग असलेले पांढरे बनियन आणि धोतर, तसेच दोन्ही हातात रिव्हॉल्व्हर असा त्याचा लूक पाहायला मिळतो. चेहऱ्यावरील राग आणि अंगावरील रक्ताचे डाग या पोस्टरमधील ॲक्शनची तीव्रता अधोरेखित करतात. …

बॉलीवूडपटांमधील श्रावणसरी

भारतीय मनाला पावसाचे आणि चित्रपटांचे आकर्षण वेगळे सांगण्याची गरज नाही. पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्या की मातीचा सुगंध, खिडकीवर थबकणारे थेंब, हातातला गरम चहाचा कप आणि कानावर पडणारे एखादे जुने हिंदी चित्रपटगीतया सगळ्यांची सांगड आपोआप घातली जाते. हिंदी चित्रपटांनी पावसाला केवळ ऋतू म्हणून न पाहता त्याला प्रेमाचा गंध, विरहाची वेदना, भेटीचा आनंद, आठवणींची हुरहूर आणि कधी …

‌‘ब्ल्यू इकॉनॉमी‌’तील कारकिर्द

वैद्यकीय शिक्षण, जैवतंत्रज्ञान, कृषीशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना परिचित असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत वेगाने महत्त्व प्राप्त करणारे मत्स्यशास्त्र हे क्षेत्र अनेकांच्या दृष्टीने अजूनही अपरिचित आहे. भारताला लाभलेला सुमारे 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा, नद्या, तलाव, धरणे आणि वाढती मत्स्यउत्पादनाची गरज यामुळे मत्स्यव्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक…

लोकप्रियता हिरव्या बांगड्यांची

बांगड्या हा सौभाग्याचा महत्त्वाचा अलंकार आहे. कालोघात तो फॅशनचाही अविभाज्य भाग बनला. बांगड्यांमध्ये आजमितीला असंख्य व्हरायटी बाजारात पाहायला मिळते. पण तरीही आजच्या आधुनिक युगातही सुवासिनींकडून हिरव्या बांगड्यांना अधिक पसंती दिली जाते. विशेषतः सणासुदीला तरुणी-महिला आवर्जून हिरव्या बांगड्या भरतात. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा असून या महिन्यात हिरव्या बांगड्यांचं मोठं महत्त्व आहे. हिरवा रंग हा…

दुधापासून कपडे निर्मिती

दुधाला फाटल्यानंतर तुम्ही खराब म्हणून फेकून देत असता त्यापासून डिझायनर साडी, कुर्तेआणि फॅशनेबल आऊटफिट तयार केले जात असतात. ऐकायला हे विचित्र वाटले; परंतु दुधापासून कपडे तयार करण्याची इंडस्ट्री सध्या चर्चेत आहे. या कपड्यांना ‌‘मिल्क फॅब्रिक‌’ म्हणतात. हे एक असे कापड आहे जे दिसायला रेशमासारखे मुलायम आणि परिधान करण्यासाठी खूपच आरामदायी असते. दुधापासून तयार होणारे कपडे …

टेरेसवरील शेतीपासून 20 एकरांच्या बेरी फार्मपर्यंत

मुंबईच्या केया सालोट यांचा व्यवसायाचा प्रवास वेगळ्या वाटेने जाण्याची प्रेरणा देणारा आहे. लहानपणापासूनच घरातील व्यवसायाचे वातावरण पाहिल्यामुळे उद्योजकतेची ओढ त्यांच्या मनात होती. मात्र, सुरुवातीला त्यांनी कॉर्पोरेट कायदा क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतातील मोठ्या कायदेविषयक कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले. काही वर्षांनी स्वतःचा व्यवसाय उभारण्याची इच्छा…

प्रचाराच्या पलीकडचे वास्तव

भाजपच्या राजकारणातील ‌‘नॅरेटिव्ह कंट्रोल‌’ला धक्का बसण्यामागे केवळ प्रचारयंत्रणेची कमजोरी हे कारण नाही. प्रचार आणि प्रत्यक्ष वास्तव यांच्यात वाढत गेलेली दरी हे त्यामागचे अधिक महत्त्वाचे कारण आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे संदेश, घोषणा आणि समाजमाध्यमांवरील मोहिमा तेव्हाच प्रभावी ठरतात, जेव्हा त्या जनतेच्या अनुभवांशी सुसंगत असतात. प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभव मात्र वेगळे असतील, तर कोणतेही प्रभावी…

अमेरिकेचा दबाव, भारतासाठी धडा

अमेरिकेच्या व्यापारधोरणातील अपयशाचे खापर आता भारतासह जगातील 40 हून अधिक देशांवर फोडण्याचा प्रयत्न होत आहे. चीनविरोधातील व्यापारयुद्ध अपेक्षित परिणाम साधू शकले नाही, यामागे चीनपेक्षा अमेरिकेच्या धोरणातील विसंगती अधिक कारणीभूत असताना त्याची जबाबदारी इतर देशांवर ढकलण्याची भूमिका ट्रम्प प्रशासनाने घेतली आहे. भारताबरोबरच जपान, दक्षिण कोरिया, कॅनडा आणि मेक्सिको यांसारख्या अमेरिकेच्या निकटवर्तीय…

आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का?

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी पार पडली. शिवसेना (ठाकरे)चे पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपविला. सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर ठाकरे गटाचेच वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद सुरु केला. यावेळी कामत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष चुकले असतील तर कोर्ट आम्हाला दिलासा देऊ शकते. विधिमंडळ पक्ष कोणत्याही निवडणुकीला उमेदवार उभा करत नाही. विधिमंडळ …

अंधश्रद्धेचा अंधार

एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले असतानाही अंधश्रद्धेची मुळे समाजाच्या मनात खोलवर रुजलेली आहेत. अमरावतीतील डोमा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमध्ये भूतबाधेची अफवा पसरून शेकडो विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडणे, ही केवळ एका आश्रमशाळेतील घटना म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. भीती, अफवा आणि अज्ञान यांचा संगम झाला की सुशिक्षित समाजही तर्काचा आधार सोडून…

‌‘पल भर के लिए‌’ झळकणार जागतिक पातळीवर

बॉलिवूड अभिनेत्री सैयमी खेर आणि चित्रपट निर्माते विक्रम फडणवीस यांचा आगामी ‌‘पल भर के लिए‌’ हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा जागतिक प्रिमियर (वर्ल्ड प्रिमियर) ‌‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न‌’ म्हणजेच ‌‘आयएफएफएम 2026‌’ मध्ये होणार आहे. या चित्रपटात सैयमी खेर यांच्यासोबतच इष्वाक सिंग, ताहिर राज भसीन आणि विनीत कुमार सिंग …

पडद्यावरचा ‌‘जननायक‌’ आणि समाज

सिनेमा आणि समाज यांचं नातं नेहमीच घट्ट राहिलं आहे. मोठा पडदा मनोरंजनाच्या गोष्टी सांगतानाच प्रशासकीय व्यवस्थेविरुद्ध आणि सामाजिक प्रश्नांविरुद्ध जागी होणाऱ्या चेतनेचंही प्रतिबिंब बनतो. जेव्हा जेव्हा भ्रष्टाचार आणि द्वेषाचं वातावरण गडद होत गेलं, तेव्हा तेव्हा पडद्यावर एक काल्पनिक ‌‘जननायक‌’ जन्माला आला, ज्यानं सामान्य माणसाच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी पाऊल उचललं. दक्षिणेतील ‌‘जना…

एकाग्रता वाढवण्यासाठी…

अभ्यासाला बसल्यावर काही मिनिटांतच मोबाईल हातात जातो, एखादे काम सुरू केले की मध्येच सामाजिक माध्यमांवरील सूचना लक्ष वेधून घेतात, तर चित्रपट पाहतानाही अनेक जण एकाच वेळी संदेशांना उत्तरे देत असतात. आजच्या डिजिटल युगात ही परिस्थिती अनेक तरुणांची झाली आहे. माहिती आणि मनोरंजनाचा भडिमार इतका वाढला आहे की, एका गोष्टीवर सलग लक्ष केंद्रित करणे दिवसेंदिवस कठीण …

मंत्रमुग्धतेचा श्रावण

उन्हाच्या तलखीनं शिणलेली शरीरं आणि मनं निवांत गारवा शोधत असताना श्रावणाच्या ओलाव्याने सपूंर्ण सृष्टीतच एक श्रान्त भाव असतो. शहरात, जंगलात, रानांमध्ये, पर्वतावर,उघडया माळरानावर, श्रावण एकाच हिरवळीच्या भावनेनं बरसत असतो. पडणाऱ्या प्रत्येक थेबांतून पुनश्च जीवन निर्माण करण्याची अमर्याद क्षमता श्रावणात आहे. सोसलेले उन्हाळे, तडाखे, सारं काही वाहून मनाला स्वच्छ करणारा असाही एक दृष्टिकोन श्रावणाविषयी…

निएंडरथल धार्मिक होते का?

निएंडरथल मानवांनी त्यांच्या गूढ जीवनाबद्दल अनेक संकेत मागे सोडले आहेत. परंतु, त्यांच्या आध्यात्मिक बाजूबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. काही पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञांना असे वाटते की, हे आदिमानव, जे 30,000 वर्षांपूर्वी नामशेष झाले, त्यांनी काही विधिवत किंवा पवित्र क्रियाकलापांमध्ये भाग घेतला असावा. निएंडरथलने केलेल्या अनेक कृती त्यांच्या धार्मिक किंवा प्रतीकात्मक विचारसरणीकडे…

कचऱ्यातून संधी शोधणारा उद्योजक

बंगळुरूमधील उद्योजक वैभव अनंत यांनी प्लास्टिकच्या वाढत्या वापराकडे केवळ पर्यावरणीय संकट म्हणून पाहिले नाही, तर त्यामध्ये नव्या व्यवसायाची संधीही शोधली. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे वाढणारा कचरा आणि त्याचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन त्यांनी पर्यावरणपूरक पॅकेजिंग क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ‌‘बॅम्ब्र्यू‌’ या कंपनीची सुरुवात झाली. ‌‘बॅम्ब्र्यू‌’मध्ये बांबू,…

धनशक्तीची सावली

अमेरिकेतील न्यायव्यवस्था ही निष्पक्षता, स्वायत्तता आणि कायद्याच्या समान अंमलबजावणीसाठी जगभरात आदर्श मानली जाते. मात्र अदानी समूहावरील लाचखोरी आणि फसवणुकीच्या प्रकरणातून या व्यवस्थेतील काही अस्वस्थ करणारे पैलू समोर आले आहेत. अमेरिकी जिल्हा न्यायाधीश निकोलस गरौफिस यांनी हे प्रकरण रद्द करण्यास अखेर संमती दिली असली, तरी त्याच वेळी डॉनल्ड ट्रंप प्रशासनाच्या न्याय विभागाच्या कार्यपद्धतीवर केलेली त्यांची…

सरकारची सत्त्वपरीक्षा

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स अर्थात सियामने ई-20 पेट्रोलच्या परिणामांविषयी सरकारला लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेला वाद आता केवळ वाहनांच्या कार्यक्षमतेपुरता मर्यादित राहिलेला नाही. वाहन उद्योगाची सर्वोच्च प्रतिनिधी संस्था असलेल्या सियामने प्रथम सरकारकडे तक्रार करून ई-20 इंधनामुळे वाहनांच्या सुट्या भागांमध्ये बिघाड वाढत असल्याचे निदर्शनास आणले आणि त्यानंतर काही दिवसांतच आपले पत्र…

राज्याच्या औद्योगिक प्रगतीच्या दाव्यांची पोलखोल

महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक इंजिन असल्याचा दावा केला जात असताना, केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीने या दाव्यालाच मोठा धक्का दिला आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या लिक्विडेट, विसर्जित किंवा कंपनी रजिस्टरमधून स्ट्राइक ऑफ झाल्या आहेत. लोकसभेत दिलेल्या उत्तरातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. औद्योगिकदृष्ट्‌‍या महत्त्वाच्या नाशिक जिल्ह्यात…

तंत्रज्ञान कपन्यांना दणका

डिजिटल तंत्रज्ञानाच्या या युगात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. व्हॉट्सॲपवरील संदेश असोत, फेसबुकवरील मतप्रदर्शन असो किंवा इन्स्टाग्रामवरील रील्स; या माध्यमांनी माणसाच्या विचारसरणीला व्यापून टाकले आहे; परंतु अलीकडच्या काळात या कंपन्यांची एकाधिकारशाही, त्यांची पारदर्शकता नसलेली कार्यप्रणाली आणि डिजिटल जगातील वाढता बेजबाबदारपणा हा लोकशाही व्यवस्थेसाठी आणि…