नागपूर/चंद्रपूरः महाराष्ट्रासह देशातील नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदव्या, गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्रांचे राज्यव्यापी रॅकेट चालवणारा कथित मास्टरमाइंड परिमल गौरकर आणि त्याच्या एका साथीदाराला दुर्गापूर पोलिसांनी आज सकाळी नागपुरातील एका घरातून अटक केली. परिमल गौरकरच्या अटकेमुळे बनावट पदव्यांच्या या राज्यव्यापी रॅकेटमधील अनेक पैलू उघडकीस येणार आहेत. विशेष म्हणजे परिमल गौरकरकडून लाखो रुपये…
मुंबई: नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीच्या जंतर-मंतरवर केलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) आपला मोर्चा आता देशभरातील सरकारी शाळांकडे वळवला आहे. सीजेपीने सुरू केलेल्या ‘स्कूल ठिक करो’ आंदोलनाचे परिणाम देशभरात दिसू लागले असतानाच आता महाराष्ट्र सरकारही सजग झाले असून राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा महिनाभरात…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला प्रचंड रोष, त्यानंतर लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींचा विचार करून शासकीय आदिवासी वसतिगृहातील प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट घालणारा शासन निर्णय आणि त्यानुषंगाने जारी करण्यात आलेली एकत्रित सुधारित नियमावलीही रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी दिली. विशेष म्हणजे पुण्यात झालेल्या काँग्रेस नेते राहुल…
छत्रपती संभाजीनगरः विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळताच प्रचलित कायदे व नियम पायदळी तुडवत मनमानी कारभार सुरू केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सिडकोतील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने सुरक्षेच्या नावाखाली महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे विविध…
अमरावतीः अमरावतीच्या सरकारी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे चार वाजता व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करून इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यामुळे ३६ बालकांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणांचे…
पुणेः राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला असून या मोफत ऑनलाइन कोचिंग उपक्रमाची व्यवहार्यता, रुपरेषा आणि धोरण निश्चितीसाठी उच्च शिक्षण संचालनालयाने सहा सदस्यांची विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली असल्याची माहिती […] The post…
छत्रपती संभाजीनगर: अनुसूचित जाती प्रवर्गात उपवर्गीकरणाचा निर्णय बेकायदेशीर आहे. मात्र, शासनाला उपगर्वीकरण हवेच असेल तर खुल्यासह सर्वच प्रवर्गांचे उपवर्गीकरण केले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली. मराठ्यांना आरक्षण हवे असल्यास ५० टक्के खुल्या प्रवर्गाच्या उपवर्गीकरणासाठी लढा सुरू करावा. मनोज जरांगे यांनी…
छत्रपती संभाजीनगर: खाजगी विनाअनुदानित शाळांना सरकारी अनुदान मिळो अथवा ना मिळो परंतु अशा शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणीसह संपूर्ण वेतन मिळण्याचा अधिकार आहे. खासगी विनाअनुदानित संस्था/शाळा देत असलेले वेतन आणि नियमानुसार देय असलेले वेतन यात फरक असल्यास संबधित संस्था/शाळेस योग्य ते निर्देश देण्याचे अधिकार शिक्षण संचालकांना आहेत, असा महत्वपूर्ण निकाल…
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ च्या निकालासंदर्भात उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकाच उमेदवाराचे नाव एकापेक्षा अधिक संवर्गांच्या गुणवत्ता यादीत आले असले, तरी प्रत्यक्ष नियुक्ती केवळ एका संवर्गातील पदावरच होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ‘पवित्र’ पोर्टलद्वारे वर्ग ३ संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) अशी एकूण २ हजार ४२१ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे राज्यातील हजारो पात्रधारक उमेदवारांना…
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत तसेच आयटीआयच्या ‘ट्रान्सफर ऑफ क्रेडिट’ योजनेतील…
मुंबई: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले आहे. महाडीबीटी २.० प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिक्षण…
छत्रपती संभाजीनगर: लक्षवेधी आंदोलने करून कायम चर्चेत राहणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्हा आणि जालना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारीची नोटीस बजावली आहे. साबळे यांनी पाच दिवसात चौकशीसाठी हजर राहून बाजू न मांडल्यास त्यांना या दोन जिल्ह्यातून तडीपार केले जाणार हे जवळपास […]…
नवी दिल्लीः नीट पेपरफुटीसह देशातील विविध स्पर्धा परीक्षांतील घोटाळे गाजत असताना आणि त्यावरून देशभरात विद्यार्थी आंदोलने करत असतानाच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) जून २०२६ मध्ये झालेल्या नेट (UGC-NET) परीक्षेतही घोटाळे झाल्याचे उघडकीस आल्यामुळे नॅशन टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयाची आधी झालेली परीक्षा रद्द करून या तिन्ही विषांची फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर केले…
नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना ‘दिमानी नक्षलवादी’ या शब्दाचा वापर केला. ‘दिमागी नक्षलवाद्यां’पासून सतर्क राहण्याची आवश्यकता असून त्यांना वेगळे पाडले जाईल, असा इशारा प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या भाषणात दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘दिमागी नक्षलवादी’ ही संज्ञा नेमकी कोणासाठी वापरली? याबाबत काहीही…
नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीयस्तरावर चर्चेचा विषय बनलेल्या जातनिहाय जनगणनेला आता मूर्तरूप आले असून भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्यूंजय कुमार नारायण यांनी याबाबतची अधिसूचना आज (१४ ऑगस्ट) जारी केली आहे. या अधिसूचनेत जनगणना अधिकाऱ्यांना ४० मुद्यांची यादी दिली असून नागरिकांच्या वैयक्तिक माहितीबरोबरच जात, धर्म, भाषा, शिक्षण अशा अनेक मुद्यांचा त्यात समावेश आहे. […] The…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (ऑरिक) परिसरात ‘ड्रोन सिटी’ विकसित करण्याच्या कामाला गती द्यावी. ड्रोन उद्योगासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून जमीन उपलब्ध करून देण्यासाठी पुढील दोन-तीन वर्षांसाठी विशेष प्रोत्साहन धोरणाचा विचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राज्यातील ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी धोरणाची प्रभावी…
नांदेड: शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेडच्या गुरूद्वारात तलवारीने हल्ला केला. निहंग गटाने नांदेडच्या माता साहिब गुरूद्वारात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास निहंग गटाने हा सशस्त्र हल्ला केल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यामुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले […]…
मुंबई: महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. वर्षा निवासस्थानी आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते,…