महाराष्ट्र जनभूमी | Maharashtrajanbhumi | ताज्या बातम्या
ताज्या बातम्या, मराठी बातम्या, महाराष्ट्र जनभूमी, Marathi News, Latest Marathi News, maharashtra janbhumi News, Jobs News, Carrer Update Your trusted source for the latest Marathi news. Get breaking news from Maharashtra and around the world, including politics, sports, entertainment, and more. Get fast and accurate news in Marathi
काही व्यक्ती केवळ पदावर काम करत नाहीत, तर आपल्या कर्तृत्वातून एक विचार निर्माण करतात. त्यांच्या कामाची पद्धत, प्रामाणिकपणा, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा समाजासाठी प्रेरणेचा विषय बनते. तुकाराम मुंढे हे माझ्यासाठी अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. सध्या मी तुकाराम मुंढे यांच्या जीवनप्रवासावरील चरित्राचे वाचन करत आहे. त्यांच्या संघर्षाचा, प्रशासकीय कारकिर्दीचा आणि तत्त्वांशी तडजोड न करण्याच्या भूमिकेचा…
‘सांस्कृतिक वार्तापत्र’च्या ‘हिंदू हुतात्मे’ विशेषांकाचे उत्साहात प्रकाशन पिंपरी चिंचवड : भारतीय स्वातंत्र्यलढा, राष्ट्ररक्षण आणि हिंदू समाजाच्या अस्मितेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांचा इतिहास समाजासमोर आणणे, त्यांच्या त्यागाची जाणीव नव्या पिढीला करून देणे आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे…
चिंचवडमध्ये दिशा सोशल फाउंडेशनच्या विशेष मुलाखतीसाठी सुमारे ३ हजार नागरिकांची उपस्थिती पिंपरी चिंचवड : चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमाला तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला सुमारे ३ हजार तरुण, नागरिक आणि ज्येष्ठांनी उपस्थिती लावून तुकाराम मुंढे…
पिंपरी चिंचवड : महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्ह्यात दिव्यांग पुनर्वसन केंद्र औंध पुणे व इनाली फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ पुणे टाऊनशिप यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २१ऑगस्ट २०२६ रोजी औंध येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्यालयामध्ये ५३ दिव्यांगांना मोफत कृत्रिम हाताचे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन औंध जिल्हा रुग्णालयाचे चिकित्सक डॉ. देवमाने, महात्मा गांधी सेवा…
पिंपरी चिंचवड : शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर शिवसेना (उबाठा ) वतीने दिले जाणारे "उद्धव श्री" पुरस्काराचे वितरण शुक्रवार दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी सुखवानी फॉर्म ताथवडे या ठिकाणी झाले यावेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत व मा. खासदार विनायक राऊत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी दिव्यांगांच्या सामाजिक…
सेक्टर ११, १२ आणि १३ मधील वाढत्या चोरीच्या घटनांनंतर चिखली पोलिसांची कारवाई ; संशयितांवर कारवाई,पोलिस पेट्रोलिंगमध्ये वाढ पिंपरी चिंचवड : चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड परिसरातील सेक्टर ११, १२ आणि १३ मधील विविध सोसायट्यांच्या परिसरात मागील काही दिवसांपासून अनोळखी व्यक्तींकडून कोयते व इतर हत्यारे घेऊन फिरण्याच्या तसेच चोरीच्या घटना निदर्शनास येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.…
पिंपरी चिंचवड : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हृदयस्पर्शी उपक्रम चिंचवड परिसरात गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने राबविला जात आहे. कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच, महात्मा फुले नगर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाला यंदाही परिसरातील महिला भगिनी, विविध संस्था आणि साधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.…
पिंपरी, पुणे (दि. २१ ऑगस्ट २०२६) पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची शुक्रवारी (दि. २१) पिंपरी येथे झालेल्या बैठकीत सर्वांनूमते पुढील कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के, कार्याध्यक्ष प्रविण (बाबु) कांबळे, उपाध्यक्ष अविनाश पर्बत, बद्रिनारायन घुगे, विकास साळवे, सरचिटणीस ओमप्रकाश पांडे, खजिनदार दिनेश दुधाळे, सहखजिनदार संजय धुतडमल, कार्यकारीणी सदस्य…
पिंपरी चिंचवड : ‘ लोकहिताची कामे प्रामाणिकपणे, करणारा सनदी अधिकारी’ महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड शहरात येत आहेत. दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने मुंढे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शनिवारी, सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल. भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रामाणिक,…
अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर चौक येथे आज सकाळी १०:३३ दरम्यान एका खासगी शाळेच्या स्कूल बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत सोडून परत येत असताना काळाखडक परिसराकडे जात होती. त्यावेळी बसमधून अचानक धूर बाहेर पडत…
- दीड महिन्यात प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश - अन्यथा येत्या अधिवेशनात अधिकाऱ्यांना धारेवर धरणार! पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रलंबित प्रकरणांना गती देण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी जिल्हा प्रशासनाला स्पष्ट ‘अल्टिमेटम’ दिला आहे. सादर झालेली भूसंपादनाची प्रकरणे पुढील दीड महिन्यात निकाली काढावीत; अन्यथा येत्या अधिवेशनात संबंधित…
मुंबई – राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्न आणि महसूल विभागाशी संबंधित सवलतींची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भातील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर, आमदार…
जुन्नर, दि. २० (रफिक शेख) - पिंपळवंडी येथे १० वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या संतापजनक घटनेने परिसरात भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तनीष्का व्यासपीठ, जुन्नर शहर व तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानच्या वतीने जुन्नर…
मुंबई पिंपरी, दि.१९ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून रावेत गृह प्रकल्प रद्द झाल्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बलांसाठी गृहप्रकल्प योजना अंतर्गत कीवळे येथील प्रकल्पात घरे देण्यात येत आहेत. सदर लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्क माफ करणे व पी एम ए वाय अनुदान बाबत बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून कीवळे गृहप्रकल्प…
निगडी : सांस्कृतिक वार्तापत्र, पुणे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘हिंदू हुतात्मे’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे प्रमुख…
पिंपरी चिंचवड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामांकित व्यक्तींचा "उद्धव श्री पुरस्कार" देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षीच्या "उद्धव श्री पुरस्कार २०२६" चे वितरण राज्यसभा खासदार संजय राऊत आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) करण्यात येणार आहे अशी माहिती…
पिंपरी चिंचवड : प्रभाग क्रमांक १८ केशवनगर चिंचवड मध्ये आठवडे बाजार मैदानात गेल्यावर्षी गणेश विसर्जन हौद तयार करण्यात आला होता तो अत्यंत चुकीचा व जनतेचा पैशाची उधळपट्टी करणारा निर्णय होता. त्या ठिकाणी हौदाची काहीच आवश्यकता नव्हती तसेच कुठल्याही नागरिकांची, गणेश भक्तांची मागणी ही नव्हती त्यामुळे त्या ठिकाणी नाहक जनतेच्या पैशाची उधळपट्टी झाली हा हाऊस का बनवला होता असा अजूनही जनतेच्या मनात प्रश्न…
पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागरमधील झुलेलाल सोसायटी, ट्रायोज सोसायटी ते नॅच्यूरल आईस्क्रीम दरम्यानचा गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला १८ मीटर रस्ता अखेर मार्गी लागणार आहे. माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक नाना काटे यांच्या पुढाकारातून हा रस्ता खासगी विकसकाच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार असून, येत्या ६ महिन्याच्या मुदतीत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामाची पाहणी…
मुंबई, दि.19 (रफिक शेख) : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. यासंदर्भात आपण पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट…